दुचाकीच्या डिक्कीमधून बनावट चावीच्या आधारे सोळा हजाराची रोकड भरदिवसा लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 16:23 IST2017-09-28T16:23:28+5:302017-09-28T16:23:34+5:30

दुचाकीच्या डिक्कीमधून बनावट चावीच्या आधारे सोळा हजाराची रोकड भरदिवसा लंपास
ठळक मुद्देबनावट चावीच्या आधारे सोळा हजाराची रोकड लंपास
नाशिक : दुचाकीच्या डिक्कीमधून बनावट चावीच्या आधारे सोळा हजाराची रोकड भरिदवसाचोरट्याने लंपास केली. शासकीय विश्रामगृहाच्या मागील बाजूच्या प्रवेशद्वाराजवळ उभ्या असलेल्या दुचाकीच्या (एम.एच २०डीबी ५२६९) डिक्क ीमधून चोरट्यांनी रोकड पळवून नेल्याची घटना सकाळच्या सुमारास घडली. दुचाकीमालक राहुल कांतीलाल पाटील (१९, रा. तिडके कॉलनी) यांच्या फिर्यादीवरून पोलीसांनी अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. दुचाकीच्या डिक्कीमध्ये ठेवलेले १६ हजार रु पयांची रोकड, एटीएम कार्ड, महत्वाची कागदपत्रे असा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी सहायक पोलीस उपनिरीक्षक दिघे हे तपास करीत आहेत.