पेठ : येथील जनता विद्यालयाच्या प्रांगणात जवळपास सहा फुटी धामण जातीचा साप आढळून आला. सद्या लॉक डाऊन मुळे शाळा बंद असल्या तरी शिक्षकांचे शाळेत ये जा सुरू आहे. शुक्र वारी ( दि. ३) रोजी सकाळी शालेय इमारतीनजिक साप आढळून आल्याने शिक्षकांची एकच धावपळ झाली. अखेर सर्पमित्र मनोज गुंजाळ यांना पाचारण करण्यात आले. त्यांनी सावधगिरीने सापाला पकडून शहराबाहेरील मोकळ्या जागेत सोडून देण्यात आले.
पेठ परिसरात निघाली सहा फुटी धामण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2020 14:33 IST