शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

बारा फ्लॅटच्या इमारतीत  मनपाने वाढविले सहा फ्लॅट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 00:48 IST

कायदेशीर इमारतीला बेकायदेशीर ठरविले, भागश: पूर्णत्वाचा दाखला घेणाऱ्या सदनिकाधारकांवर अख्ख्या इमारतीचा कर बोजा टाकणे इतकेच नव्हे तर शंभर वर्षांपूर्वीच्या लाकडी वाड्याला सीमेंटचे बांधकाम ठरविणे, असे अनेक कारनामे करणाºया महापालिकेने खासगी एजन्सीच्या सर्वेक्षणावर विश्वास ठेवून या सर्वांवर कळस ठरेल,

नाशिक : कायदेशीर इमारतीला बेकायदेशीर ठरविले, भागश: पूर्णत्वाचा दाखला घेणाऱ्या सदनिकाधारकांवर अख्ख्या इमारतीचा कर बोजा टाकणे इतकेच नव्हे तर शंभर वर्षांपूर्वीच्या लाकडी वाड्याला सीमेंटचे बांधकाम ठरविणे, असे अनेक कारनामे करणाºया महापालिकेने खासगी एजन्सीच्या सर्वेक्षणावर विश्वास ठेवून या सर्वांवर कळस ठरेल, अशी कामगिरी केली आहे. भाभानगर येथील एका इमारतीत १२ फ्लॅट असताना १८ फ्लॅट असल्याचे दाखवत दंडासह घरपट्टी आकारण्याची नोटीस बजावली आहे.  महापालिकेच्या या कारनाम्यामुळे मात्र संबंधित विकासक अडचणीत आला असून, सहा अतिरिक्त फ्लॅट आणले कोठून असा प्रश्न करीत त्याने आक्षेप नोंदवला आहे.  ज्या मिळकतींना घरपट्टीच लागू नाही अशा ६२ हजार मिळकती शोधून काढल्याचा धाडसी दावा महापालिकेच्या प्रशासनाने काही वर्षांपूर्वी केला होता. आता या मिळकतीच्या मालकांकडून सहा वर्षे मागे जाऊन तिप्पट घरपट्टी आकारण्याचे आणि त्यामाध्यमातून महापालिकेची तिजोरी भरण्याचे मनसुबे रचले जात आहेत, परंतु त्याचा पायाच किती कच्चा आहे हे यानिमित्ताने उघड होत आहेत.भाभानगर येथील सर्व्हे क्रमांक ५१२/३ प्लॉट नंबर ६ व ७ वर एक इमारत २००० सालापूर्वी बांधण्यात आली आहे. या इमारतीत बारा सदनिका असून, त्यापैकी सहा सदनिकांना भागश: पूर्णत्वाचा दाखला मिळाला आहे. संबंधित मालक त्याची घरपट्टी नियमितपणे भरत असताना महापालिकेने त्यांना नोटीस बजावली असून, १८ सदनिकांची घरपट्टी ७४ हजार रुपये भरण्यास सांगण्यात आले आहे. ज्या इमारतीत बारा सदनिका आहेत ते अचानक बारा आभासी घरे कोणी बांधली असा प्रश्न संबंधिताना पडला आहे. विशेष म्हणजे सर्व सदनिकांची क्षेत्रफळे वेगवेगळी दाखवली असून, त्यामुळे हा आणखीनच बुचकळ्यात टाकण्याचा प्रकार ठरला आहे. महापालिकेने बजावलेल्या नोटिसीत रिपोर्टनुसार असा उल्लेख आहे, परंतु असा कोणता रिपोर्ट आणि तो कोणी सादर केला ते माहिती नाही.अशाच प्रकारे अशोकस्तंभावरील डॉक्टर हाउसमधील एका हॉस्पिटलच्या बोकांडी संपूर्ण इमारतीपोटी नऊ लाख रुपयांची घरपट्टी भरण्याची मागणी केल्याने संबंधित व्यावसायिकाची डोळे पांढरे होण्याची वेळ आली आहे.सर्व्हेच नाही : जागामालकांनी केला प्रश्नसर्वांत महत्त्वाचे म्हणजे गेल्या पाच ते सहा वर्षांत या इमारतीत महापालिकेच्या वतीने कोणी सर्व्हे केला नाही की, कोणाकडे बांधकामाचे नकाशे मागितले नाही. त्यामुळे महापालिकेचे हे रेकॉर्ड कोणी आणि कसे केले असा प्रश्न मिळकतधारकाने केला आहे. या मिळकतीला २०११ मध्ये पूर्णत्वाचा दाखला मिळाला तेव्हापासून मिळकतधारक नियमितपणे घरपट्टी भरत असताना महापालिकेने १ एप्रिल २०१२ पासून कर आकारणी केल्याने अगोदर भरलेल्या कराचे काय करायचे, असा प्रश्न जागा मालकाने केला आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNashikनाशिक