शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री! आजपासून तिकीट दरवाढ लागू; जाणून घ्या तुमचे तिकीट किती रुपयांनी महागले?
3
मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना देखील मेरी ख्रिसमस; नायजेरियात ISIS वर बॉम्ब हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २६ डिसेंबर २०२५: आनंद व उत्साहाचे वातावरण; कामात यश मिळेल!
5
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
6
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
7
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
8
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
9
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
10
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
11
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
12
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
13
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
14
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
15
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
16
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
17
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
18
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
19
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
20
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
Daily Top 2Weekly Top 5

परिस्थिती पूर्वपदाकडे : आज गृहराज्यमंत्र्यांचा दौरा

By admin | Updated: July 18, 2015 23:10 IST

हरसूलमध्ये ईद शांततेत

नाशिक : हरसूल आणि ठाणापाडा परिसरात असलेल्या तणावपूर्ण स्थितीत शनिवारी ईद शांततेत साजरी झाली. यादरम्यान, परिसरात झालेल्या शांतता समितीच्या सभेलाही गावकऱ्यांनी हजेरी लावली.गेल्या काही दिवसांपासून होरपळणाऱ्या हरसूल आणि ठाणापाडा परिसरात ईदसाठी विशेष बंदोबस्त लावण्यात आला होता. अनेक राजकीय नेत्यांच्या आवाहनानंतर येथे तणावपूर्ण शांततेत ईदसाठी दुकाने उघडली गेली. हरसूलमधील लूटमार झालेली दुकानेही आज उगडण्यात आली. परिवहन महामंडळाची आणि खासगी वाहतूकही येथे सुरळीत झाल्याने परिसरात भाजीपाला, दूध आणि गॅसचे वितरण सुरू झाले. भाजीबाजाराबरोबरच ईदसाठी बाजार लावल्याने खरेदीसाठी नागरिकही बाहेर पडल्याचे दिसत होते. यातच पोलिसांनी आयोजित केलेल्या शांतता सभेला परिसरातील सर्वधर्मीयांनी प्रतिसाद देत हजेरी लावली. त्यामुळे परिसरातील वातावरण पूर्वपदावर येण्याकडे सुरुवात झाल्याचे दिसून आले. सकाळी ईदचे नमाजपठण झाल्यानंतर सायंकाळी एकमेकांना शुभेच्छा देताना दिसत होते. त्यामुळे वातावरण पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाल्याचे दिसून येत होते. दरम्यान, परिसरात असलेला पोलीस बंदोबस्त कायम असल्याने दिवसभरात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.(प्रतिनिधी)