सापगावच्या सरपंचपदी सीताबाई दिवे बिनविरोध

By Admin | Updated: November 18, 2015 23:14 IST2015-11-18T23:13:30+5:302015-11-18T23:14:18+5:30

सापगावच्या सरपंचपदी सीताबाई दिवे बिनविरोध

Sitabai Divas for the Sarpanch of Jagdish | सापगावच्या सरपंचपदी सीताबाई दिवे बिनविरोध

सापगावच्या सरपंचपदी सीताबाई दिवे बिनविरोध

त्र्यंबकेश्वर : येथून जवळच असलेल्या सापगावच्या सरपंचपदी सीताबाई दिवे, तर उपसरपंचपदी काळू दिवे यांची बिनविरोध निवड झाली. सरपंच सावित्रीबाई दिवे यांनी रोटेशनप्रमाणे राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदावर ही निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आर. बी. सोनवणे यांनी काम पाहिले.
सापगाव ग्रामपंचायतीच्या सभागृहात दुपारी २ वाजता विशेष सभा बोलावण्यात आली होती. सरपंचपदासाठी सीताबाई रामदास दिवे यांचा एकमेव अर्ज आला होता. पीठासीन अधिकारी आर. बी. सोनवणे यांनी सरपंच म्हणून सीताबाई दिवे यांचे नाव घोषित केले.
याप्रसंगी दीपक दिवे, देवीदास दिवे, मंगला दिवे, भागाबाई दिवे, एन. व्ही. परदेशी, ग्रामसेवक सारिका जगताप, जिल्हा परिषद सदस्य संपतराव सकाळे, पं. स. सदस्य शांताराम मुळाणे, संजय कांबळे, चंदर कांबळे, निवृत्ती दिवे, रावजी दिवे, मोहन दिवे, गोपाळ दिवे, लक्ष्मण दिवे आदि उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Sitabai Divas for the Sarpanch of Jagdish

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.