शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकच्या धडकेत बहीण ठार, भाऊ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 01:02 IST

मुंबई-आग्रा महामार्गावरील अमृतधामजवळील बळी मंदिर चौफुली जोड रस्त्यावरून ट्रक व दुचाकी सोबत वळण घेत असताना ट्रकचालकाचे नियंत्रण सुटल्याने दुचाकीचालक ट्रकच्या चाकांखाली सापडला. यावेळी दुचाकीच्या पाठीमागे बसलेल्या युवतीचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकीचालक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.

ठळक मुद्देबळीमंदिर : हेल्मेटमुळे वाचले प्राण

पंचवटी/आडगाव : मुंबई-आग्रा महामार्गावरील अमृतधामजवळील बळी मंदिर चौफुली जोड रस्त्यावरून ट्रक व दुचाकी सोबत वळण घेत असताना ट्रकचालकाचे नियंत्रण सुटल्याने दुचाकीचालक ट्रकच्या चाकांखाली सापडला. यावेळी दुचाकीच्या पाठीमागे बसलेल्या युवतीचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकीचालक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. सदर घटना गुरुवारी (दि.१७) सकाळी घडली.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आडगावच्या दिशेने प्रफुल्ल चंद्रशेखर खैरनार (२३) हे दुचाकीने (एमएच १५, जीएन २४३३) बहीण शुभांगी चंद्रशेखर खैरनार (१९, दोघे रा. विठाई, ता. साक्री) सोबत द्वारकेकडे जात होते. यावेळी महामार्गावरून द्वारके च्या दिशेने येणाऱ्या आयशर ट्रकने (एमएच १५, ईजी ७४९९) बळी मंदिर चौफुलीवरून डावीकडे औरंगाबाद महामार्गाला जोडणाºया रिंगरोडवर वळण घेतले. दरम्यान, त्याचवेळी दुचाकीचालक खैरनार यांनीदेखील समांतर रस्त्यावर येण्यासाठी दुचाकी वळविली. यावेळी ट्रकचालकाचे नियंत्रण सुटल्याने खैरनार यांच्या दुचाकीला ट्रकने जोरदार धडक दिली. दैव बलवत्तर म्हणून प्रफुल्ल खैरनार यांचे प्राण वाचले, मात्र दुर्दैवाने त्यांची बहीण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी पडली. या धडकेत प्रफु ल्ल यांनी परिधान केलेल्या हेल्मेटचा अक्षरश: चुरा झाला. अपघात घडल्यानंतर घटनास्थळी नागरिकांची एकच गर्दी जमली. तत्काळ जखमी प्रफुल्ल यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. चौफुलीवर वाहतूक नियंत्रणासाठी वाहतूक पोलिसांचा मोठा लवाजमा होता; कारण संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांचा दौरा असल्याने महामार्गावर नेहमीपेक्षा अधिक वाहतूक पोलीस होते. तरीदेखील ट्रकचालकाने वळण घेताना निष्काळजीपणा दाखवून भरधाव वेगाने वाहन दामटविण्याचा प्रयत्न केला; मात्र ही बाब पोलिसांच्या लक्षात आली नाही. परिणामी दुचाकीवरून जाणाºया भावाने बहिणीला गमावले असून, तोदेखील गंभीर जखमी झाला आहे.आडगाव पोलिसांनी संशयित ट्रकचालक जगसलाल धनसर पाल (५१, रा. देवासनाका, इंदूर) याला ताब्यात घेतले आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू