शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नरला कोविड हेल्थ रुग्णालयात शिक्षकांची ड्युटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 01:00 IST

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. कोरोनाबाधित रुग्णांना डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरवर उत्तम दर्जाची आरोग्य सुविधा मिळावी यासाठी सिन्नर पंचायत समितीच्या वतीने कॉल सेंटर उभारण्यात आले असून, तेथे तीन शिफ्टमध्ये शिक्षकांना ड्युटी लावण्यात आली आहे.

ठळक मुद्दे रुग्णांच्या मदतीसाठी कॉल सेंटर; २४ तास राहणार सेवा

सिन्नर : कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. कोरोनाबाधित रुग्णांना डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरवर उत्तम दर्जाची आरोग्य सुविधा मिळावी यासाठी सिन्नर पंचायत समितीच्या वतीने कॉल सेंटर उभारण्यात आले असून, तेथे तीन शिफ्टमध्ये शिक्षकांना ड्युटी लावण्यात आली आहे. गटविकास अधिकारी तथा नोडल अधिकारी मधुकर मुरकुटे, तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. मोहन बच्छाव यांच्या स्वाक्षरीने तसे आदेश काढण्यात आले आहेत. कोविड केअर सेंटरमधून संदर्भित केलेल्या रुग्णांना डीसीएचसीमध्ये खाटा उपलब्ध करून देणे, सरकारी डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये खाटा उपलब्ध नसल्यास जवळच्या शासकीय अथवा खासगी डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये संपर्क साधून तशी व्यवस्था करणे, कोविड केअर सेंटरला त्याप्रमाणे कळविणे, रुग्णांना संदर्भित करण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून देणे, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमधून डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलला रुग्ण संदर्भित करताना खाटा आरक्षित करणे, तेथे खाटा उपलब्ध नसल्यास महापालिकेच्या कॉल सेंटरला संपर्क साधून अशा रुग्णांना खाटा उपलब्ध करून देणे आदी कामे या काॅल सेंटरच्या माध्यमातून शिक्षकांना करावी लागणार आहे. त्याचप्रमाणे रुग्णांच्या नातेवाइकांच्या समस्या संबंधित प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी व वैद्यकीय अधिकारी यांच्या समन्वयाने सोडवाव्या लागणार आहेत. दरम्यान, या आदेशाचा अवमान करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ व प्रतिबंधात्मक कायदा १८९७ आणि शासनाच्या प्रचलित नियमानुसार कारवाई करण्याचा इशारा गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन बच्छाव यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आलेल्या आदेशात देण्यात आला आहे.सिन्नर तालुक्यात कोरोनाचा रुग्ण आढळून आल्यास त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचे अलगीकरण करण्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांना नोडल अधिकारी म्हणून विशेषाधिकार दिले आहेत. त्या अधिकाराचा वापर करून गटविकास अधिकाऱ्यांनी पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील शिक्षकांना अधिकृत करून डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरच्या कॉल सेंटरमध्ये नियुक्त्या दिल्या आहेत.२४ तास राहणार शिक्षक कार्यरतसकाळी ८ ते दुपारी ४, दुपारी ४ ते रात्री १२ आणि रात्री १२ ते सकाळी ८ अशा तीन शिफ्ट शिक्षकांना या काॅल सेंटरवर ड्युटी लावण्यात आली आहे. त्यामुळे रुग्णांच्या सेवेसाठी हे सेंटर २४ तास सुरू राहील. प्रत्येक शिफ्टमध्ये २ याप्रमाणे दररोज सहा शिक्षकांना ड्युटी लावण्यात आली आहे. प्रत्येक शिक्षकास दहा दिवस या कॉल सेंटरवर काम करावे लागणार आहे.

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्याTeacherशिक्षक