जलसंधारण कामाच्या प्रशिक्षणासाठी सिन्नरचे प्रशिक्षणार्थी रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 17:46 IST2019-02-14T17:46:37+5:302019-02-14T17:46:51+5:30
सिन्नर : सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धेसाठी गाव परिसरात करावयाच्या जलसंधारण कामाच्या प्रशिक्षणासाठी सिन्नरहून दुष्काळी गावांतील महिलांची पहिली तुकडी प्रशिक्षणासाठी रवाना झाली.

जलसंधारण कामाच्या प्रशिक्षणासाठी सिन्नरचे प्रशिक्षणार्थी रवाना
सिन्नर : सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धेसाठी गाव परिसरात करावयाच्या जलसंधारण कामाच्या प्रशिक्षणासाठी सिन्नरहून दुष्काळी गावांतील महिलांची पहिली तुकडी प्रशिक्षणासाठी रवाना झाली. दुष्काळी सिन्नर तालुक्यात पानी फाउंडेशनच्या वॉटरकप स्पर्धेची निवड झाल्यानंतर विविध गावांत याबाबत जनजागृती करण्यात आली. तालुक्यातील १२४ गावांनी या स्पर्धेत भाग घेतला. या स्पर्धेतील सहभागी गावांतील महिलांच्या प्रशिक्षणाची पहिली तुकडी बुधवारी (दि.१३) रवाना झाली.
आमदार राजाभाऊ वाजे यांनी हिरवा झेंडा दाखवून तालुक्यातील महिला प्रशिक्षणार्थींची बस रवाना केली. आगारप्रमुख भूषण सूर्यवंशी, गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड, सहाय्यक गटविकास अधिकारी रत्नाकर पगार, आगार व्यवस्थापक सुरेश दराडे, पानी फाउंडेशनच्या समन्वयक सुषमा मानकर, नागेश गरड, प्रवीण डोणगावे आदी उपस्थित होते.
घोरवड, धोंडबार, मनेगाव, डुबेरे, चंद्रपूर, सोनारी, डुबेरेवाडी, सरदवाडी, वडझिरे या गावांतील ५० महिला या प्रशिक्षणात सहभागी होणार आहेत. चांदवड तालुक्यातील मळमदरे येथे चार दिवसांचे निवासी प्रशिक्षण होणार आहे.