जिल्हाध्यक्ष शरद शिंदे, संपर्कप्रमुख दत्ता बोडके, उपजिल्हा प्रमुख संतोष गायधनी यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्याध्यक्ष बल्लू जवंजाळ यांच्यामार्फत कडू यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले. सिन्नर शहरात झोपडपट्टीधारकांची ४० वर्षांपासून घरे आहेत. ती कायमस्वरूपी त्यांच्या नावावर करण्याच्या प्रलंबित प्रश्नावर चर्चा करण्यात आली. यावेळी कामगार संघटनेचे तालुकाध्यक्ष मुकुंद खर्जे, गणेश खर्जे, सागर लोंढे, चंद्रकांत डावरे, बापू चव्हाण, गणेश धनगर आदी उपस्थित होते.
सिन्नरच्या झोपडपट्टीवासीयांची घरे नावावर करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 16:57 IST