शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

सिन्नरचे उद्योजक खंडित वीजपुरवठ्याने संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 12:58 AM

सातपूर : सिन्नर औद्योगिक वसाहतीत खंडित वीज पुरवठ्यामुळे उत्पादन प्रक्रिया ठप्प होऊन कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याने उद्योजकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

ठळक मुद्देकोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याने उद्योजकांमध्ये तीव्र संताप

सातपूर : सिन्नर औद्योगिक वसाहतीत खंडित वीज पुरवठ्यामुळे उत्पादन प्रक्रिया ठप्प होऊन कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याने उद्योजकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.रविवारी दुपारी १ वाजेपासून संध्याकाळी ७ वाजेपर्यंत सिन्नर आणि माळेगाव औद्योगिक वसाहतीत विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता. कोणत्याही पूर्वसूचनेविना अचानक वीज पुरवठा खंडित केल्याने उद्योजकांचे अतोनात हाल झालेत. याबाबत सिन्नर निमा ऊर्जा समितीचे अध्यक्ष बबन वाजे आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी व उद्योजकांनी तक्रार नोंदविण्यास महावितरण कार्यालयास संपर्क साधला असता कुणीही जबाबदार अधिकारी दखल घेण्यास तयार नव्हते. तब्बल सात ते आठ तास वीज गायब असल्याने शेकडो उद्योगांना उत्पादन बंद ठेवत नुकसान सोसावे लागले. आधीच मंदीचा सामना करत असलेल्या उद्योजकांमध्ये यामुळे तीव्र असंतोषाची भावना निमा व्यक्त करण्यात आली. आधीच राज्यातील वीजदर अन्य राज्यांच्या तुलनेत जास्त असल्याने निमातर्फे विविध स्तरांवर पाठपुरावा केला जात आहे. त्यात भर म्हणजे असे प्रकार होत असल्यास ते उद्योगांच्या वाटचालीस मारक ठरणार असून, या बाबतीत योग्य ती कार्यवाही न झाल्यास वरिष्ठ स्तरावर निमा पाठपुरावा करेल, अशी माहिती निमाचे सरचिटणीस तुषार चव्हाण यांनी दिली.