शिवशाही बस बायपासहून परस्पर जात असल्याने सिन्नरकरांची नाराजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 17:46 IST2019-02-13T17:46:28+5:302019-02-13T17:46:43+5:30
सिन्नर : नाशिकहून पुण्याला जाणाऱ्या शिवशाही बसेस स्थानकात न येता परस्पर सिन्नर वळण रस्त्यावरूनच निघून जात असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

शिवशाही बस बायपासहून परस्पर जात असल्याने सिन्नरकरांची नाराजी
सिन्नर : नाशिकहून पुण्याला जाणाऱ्या शिवशाही बसेस स्थानकात न येता परस्पर सिन्नर वळण रस्त्यावरूनच निघून जात असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.
राज्य परिवहन महामंडळ सिन्नरकरांना किती दिवस सापत्नपणाची वागणूक देणार असा प्रश्न प्रवाशी करत असून रिकाम्या धावणाºया शिवशाही बसेस सिन्नरच्या बसस्थानकात आल्या नाहीत तर आंदोलन करण्याचा इशारा प्रवाशांनी दिला आहे.
एस. टी. महामंडळाने सुरू केलेल्या शिवशाही बसेस अनेकदा रिकाम्याच धावतात. पुरसे प्रवासी नसतील तर नाशिकरोड बसस्थानकावर अर्धा-अर्धा तास प्रवाशांची वाट पहात उभ्या राहतात. तरीही प्रवासी मिळाले नाही तर अर्ध्या रिकाम्याच सिन्नरच्या बाहेरून निघून जातात. नाशिकहून सिन्नरला जाण्यासाठी या बसेसमध्ये जायचे असल्यास या बसेसला सिन्नरसाठी थांबा नसल्याचे कारण सांगितले जाते. रिकाम्या बस पळवून महामंडळाचे आर्थिक नुकसान होत असल्याकडे सोईस्कर दुर्लक्ष करण्यात येत असल्याबद्दल सिन्नरच्या प्रवाशांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
अनेक सिन्नरकर नोकरीनिमित्त पुण्यात राहतात. आठवड्यातून एकदा ते सिन्नरला येतात. शिवाशाही बसेस गावाच्या बाहेरच उतरवून निघुन जात असल्याने शिवशाहीचे प्रवास करण्याचे त्यांच्याकडून टाळले जात आहे. शहरातील अनेक व्यावसाईक, दोन्ही औद्योगिक वसाहतीतील अधिकारी विविध कारणांसाठी पुण्याला जात असतात. मात्र, शिवशाहीची व्यवस्थाच नसल्याने खासगी आराम बसेसचा आधार घ्यावा लागतोे.