शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नरभूषण ह. भ. प. त्र्यंबकबाबा भगत यांचे निधन; भक्त परिवारावर पसरली शोककळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2021 08:16 IST

सिन्नर ( नाशिक ) : राज्यभर वारकरी संप्रदायाची पताका फडकविणारे, सिन्नरभूषण, ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराजांचे प्रमुख सेवेकरी, अध्यात्म क्षेत्रातील ...

सिन्नर (नाशिक) : राज्यभर वारकरी संप्रदायाची पताका फडकविणारे, सिन्नरभूषण, ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराजांचे प्रमुख सेवेकरी, अध्यात्म क्षेत्रातील ज्येष्ठ मार्गदर्शक ह. भ. प. त्र्यंबक बाबा भगत  (वय 89) यांचे गुरुवारी पहाटे 5 वाजता राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले. वाढदिवसाच्या दिवशीच त्यांचे निधन झाल्याने राज्यभरातील त्यांच्या भक्त परिवारावर शोककळा पसरली आहे.

गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. दोन/तीन दिवसांपासून त्यांची तब्येत अत्यस्वस्थ बनली होती. गुरुवारी पहाटे भैरवनाथ महाराज मंदिरातील काकड आरती सुरु होत असतानाच त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन भाऊ, नातू व संपूर्ण राज्यभर हजारो भक्तगण असा परिवार आहे.  सिन्नर शहरातील भैरवनाथ मंदिरात श्री हरिनाम सप्ताहाचे त्यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 44 वर्षांपासून आयोजन करण्यात येते. तर तळ्यातील भैरवनाथ मंदिरात 60 वर्षांपासून हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. या दोन्ही धार्मिक सोहळ्याला विशेष महत्त्व आहे. अनेक धार्मिक सोहळ्यांना त्रंबक बाबा यांना विशेष मान होता.

भैरवनाथ मंदिरात सकाळची काकड आरती अनेक वर्षांपासून त्यांच्याच नेतृत्वाखाली सुरु झाली. भैरवनाथ मंदिर, मोठा गणपती यासह अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार त्यांच्याच नेतृत्वाखाली करण्यात आला. थोरले बाजीराव पेशवे पतसंस्थेने त्यांचा सिन्नर भूषण पुरस्कार देऊन गौरव केला होता. यासह अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले होते. बाबांच्या निधनाने सिन्नरसह राज्यभरातील त्यांच्या भक्त परिवारावर शोककळा पसरली आहे.

टॅग्स :NashikनाशिकDeathमृत्यू