सिन्नरला दोन ठिकाणी घरफोडीत चार लाखांचा ऐवज लांबविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:37 IST2020-12-04T04:37:04+5:302020-12-04T04:37:04+5:30
विजय नगर परिसरात न्यू सिटी हाईट या अपार्टमेंटमध्ये सोमनाथ आनंदराव कासट (६३) हे व्यापारी वास्तव्यास असून काही कामानिमित्त ...

सिन्नरला दोन ठिकाणी घरफोडीत चार लाखांचा ऐवज लांबविला
विजय नगर परिसरात न्यू सिटी हाईट या अपार्टमेंटमध्ये सोमनाथ आनंदराव कासट (६३) हे व्यापारी वास्तव्यास असून काही कामानिमित्त ते बाहेर गेलेेले असल्याने घराला कुलूप लावलेले होते. चोरट्यांनी संधी साधत सकाळी ९.३० ते १२.३० वाजे दरम्यान कासट यांच्या घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला. घरातील कपाट फोडून त्यातील ३० हजार रुपये किमतीच्या चार ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या ४ अंगठ्या आणि ५० हजार रुपये रोख रक्कम असा एकूण ८० हजारांचा ऐवज चोरून नेला.
कासट यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी सिन्नर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. याबाबत चोरट्याविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रामदास धुमाळ करत आहे.
औद्योगिक वसाहतीलगत असलेल्या उज्वल नगर मध्ये राहणारे बिरजू राजाराम पाल (४८) यांच्या घरात चोरट्यांनी सकाळी ७.३० वाजे दरम्यान स्क्रू ड्रावरच्या साह्याने कपाट उघडले. व ३ लाख रुपयांची रोकड लंपास केली. याप्रकरणी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करत आहे.