सिन्नरला दोन ठिकाणी घरफोडीत चार लाखांचा ऐवज लांबविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2020 09:16 PM2020-12-02T21:16:48+5:302020-12-03T00:37:05+5:30

सिन्नर: शहरातील विजय नगर तसेच मुसळगाव औद्योगिक वसाहतीच्या परिसरातील उज्वल नगर या दोन ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत सुमारे 3 लाख 80 हजारांचा ऐवज लांबविल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आल्याने खळबळ उडाली. वर्दळीच्या व मध्यवर्ती भागात भरदिवसा घरफोडी झाल्याने नागरिकांमध्ये भीती व्यक्त केली जात आहे.

Sinnar was robbed of Rs 4 lakh in two burglary cases | सिन्नरला दोन ठिकाणी घरफोडीत चार लाखांचा ऐवज लांबविला

सिन्नरला दोन ठिकाणी घरफोडीत चार लाखांचा ऐवज लांबविला

Next
ठळक मुद्दे एकूण 80 हजारांचा ऐवज चोरून नेला.

सिन्नर: शहरातील विजय नगर तसेच मुसळगाव औद्योगिक वसाहतीच्या परिसरातील उज्वल नगर या दोन ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत सुमारे 3 लाख 80 हजारांचा ऐवज लांबविल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आल्याने खळबळ उडाली. वर्दळीच्या व मध्यवर्ती भागात भरदिवसा घरफोडी झाल्याने नागरिकांमध्ये भीती व्यक्त केली जात आहे.

            विजय नगर परिसरात न्यू सिटी हाईट या अपार्टमेंटमध्ये सोमनाथ आनंदराव कासट (63) हे व्यापारी वास्तव्यास असून काही कामानिमित्त ते बाहेर गेलेले असल्याने घराला कुलूप लावलेले होते. अज्ञात चोरट्यांनी संधी साधत सकाळी 9.30 ते 12.30 वाजे दरम्यान कासट यांच्या घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला. घरातील कपाट फोडून त्यातील 30 हजार रुपये किमतीच्या चार ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या 4 अंगठ्या आणि 50 हजार रुपये रोख रक्कम असा एकूण 80 हजारांचा ऐवज चोरून नेला.

             कासट यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी सिन्नर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. याबाबत अज्ञात चोरट्याविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रामदास धुमाळ करत आहे.
                    औद्योगिक वसाहतीलगत असलेल्या उज्वल नगर मध्ये राहणारे बिरजू राजाराम पाल (48) यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी सकाळी 7.30 वाजे दरम्यान प्रवेश करत स्क्रू ड्रावरच्या साह्याने कपाट उघडले. या कपाटातून 3 लाख रुपयांची रोकड लंपास केली. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करत आहे.

 

Web Title: Sinnar was robbed of Rs 4 lakh in two burglary cases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.