सिन्नरच्या विद्यार्थ्यांनी जाणून घेतले पोलीस दादांचे काम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2019 05:35 PM2019-11-25T17:35:45+5:302019-11-25T17:36:26+5:30

सिन्नर : येथील एस. जी. पब्लिक स्कूलच्या दुसरीच्या विद्यार्थ्यांनी पोलीस ठाणे व तहसील कार्यालयाच्या भेट दिली. पोलीस दादांचे काम जाणून घेतांना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर कुतूहल दिसून येत होते. अगदी ख-या खुºया बंदूका व खरे खुरे पोलिस दादांची भेट घडवून आल्याचा आनंद चेहºयावर होता. सोबतच तहसीलदार कार्यालयात जावून विविध योजनांचा कारभार कसा चालतो याची सविस्तर माहिती चिमुकल्यांनी जाणून घेतली.

 Sinnar students learn police work! | सिन्नरच्या विद्यार्थ्यांनी जाणून घेतले पोलीस दादांचे काम!

सिन्नरच्या विद्यार्थ्यांनी जाणून घेतले पोलीस दादांचे काम!

googlenewsNext

संस्थेचे सचिव राजेश गडाख यांच्या संकल्पनेतून वर्षभर वेगवेगळ्या ठिकाणी क्षेत्रभेट उपक्रम राबविण्यात येतो. त्यात मुख्याध्यापक उदय कुदळे यांच्या मार्गदर्शनाखाली वर्गशिक्षक विनायक काकुळते, पांडुरंग लोहकरे, गणेश सुके, योगेश चव्हाणके यांनी या संपूर्ण क्षेत्रभेटीचे नियोजन केले. दुसरीच्या २१३ विद्यार्थ्यांनी पोलीस यंत्रणा, महसूल यंत्रणा कशी कामकाज करते याचे प्रात्यक्षिक अनुभवले. याठिकाणी पोलीस निरीक्षक साहेबराव पाटील, साहाय्यक पोलीस निरिक्षक आर. बी. रसडे व तहसीलदार राहूल कोताडे यांनी स्वागत केले. यावेळी पोलीस हवालदार हरिश्चंद्र गोसावी, नायक विनायक आहेर, पोलीस शिपाई किरण पवार, प्रविण गुंजाळ यांनी ठाण्यामधील ठाणे अंमलदार कक्ष, वायरलेस यंत्रणा, गोपनीय कक्ष, क्राईम रूम, मुद्देमाल कक्ष, बारनिशी कक्ष, शस्त्रगार रूम, व लॉकअप रूम यांची माहिती दिली. तसेच एस.एल.आर व कार्बाइन बोअर राईफल, पिस्टल, बोअर रायफल याची प्रात्यक्षिकासह माहिती दिली. तसेच सहाय्यक पोलीस निरिक्षक रसडे यांनी बालसंरक्षक कायदा कसा आहे व बालकांनी लैंगिक अत्याचारापासून कसे संरक्षण मिळावे व सावधगिरी कशी बाळगावी याचे मार्गदर्शन केले. काकुळते यांनी क्षेत्रभेटीचा उद्देश स्पष्ट करीत आभार मानले.

Web Title:  Sinnar students learn police work!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.