सिन्नरला संकल्प दिवस उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:11 IST2021-06-20T04:11:15+5:302021-06-20T04:11:15+5:30

गत दीड वर्षापासून देश महामारीचा सामना करत आहे. या काळात शेतकरी, कष्टकरी हातावर पोट असणाऱ्यांचे जगणे कठीण झाले ...

Sinnar in Sankalp Day excitement | सिन्नरला संकल्प दिवस उत्साहात

सिन्नरला संकल्प दिवस उत्साहात

गत दीड वर्षापासून देश महामारीचा सामना करत आहे. या काळात शेतकरी, कष्टकरी हातावर पोट असणाऱ्यांचे जगणे कठीण झाले आहे. उद्योगधंदे व्यवसाय बंद पडल्याने लाखो बेरोजगार देशोधडीला लागेल असून, दिशाहीन नेतृत्वामुळे देश एका अभूतपूर्व संकटाचा सामना करत असल्याचा आरोप तालुका काँग्रेसचे अध्यक्ष विनायक सांगळे यांनी केला. यावेळी ‘राहुलजी को लाना है, देश को बचाना है’ अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. यावेळी सिन्नर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विनायक सांगळे, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मुहाहित खतीब, जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष दिनेश चोथवे, अश्फाक शेख, तालुका समन्वयक उदय जाधव, सिन्नर शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा रत्नमाला मोकळ, जाकीर भाई शेख, विकास जाधव, दामोधर शेळके, रावसाहेब थोरात, ज्ञानेश्वर पवार, अश्पाक शेख, माजी नगरसेवक युगेन क्षत्रिय, बाळासाहेब गोर्डे, शिवराम शिंदे, सुनील सोनवणे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

फोटो - १९ सिन्नर काँग्रेस

सिन्नर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने संकल्प दिवस साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी विनायक सांगळे, मुजाहित खतीब, युगेन क्षत्रिय, दिनेश चोथवे यांच्यासह कार्यकर्ते.

===Photopath===

190621\19nsk_28_19062021_13.jpg

===Caption===

फोटो - १९ सिन्नर काँग्रेस सिन्नर तालुका कॉँग्रेस कमिटीच्यावतीने संकल्प दिवस साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी विनायक सांगळे, मुजाहित खतीब, युगेन क्षत्रिय, दिनेश चोथवे यांच्यासह  कार्यकर्ते.

Web Title: Sinnar in Sankalp Day excitement