शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

सिन्नर व्यापारी बँक बंद करण्यास विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 11:44 PM

सिन्नर : सिन्नर व्यापारी सहकारी बँकेवर अवसायक नेमण्याच्या कार्यवाहीस दहा वर्षे पूर्ण झाल्याने कायद्यातील तरतुदीनुसार या बँकेची नोंदणी रद्द करण्यासाठी अवसायक एस.पी. रुद्राक्ष यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहात अंतिम सर्वसाधारण सभा झाली. तथापि, नोंदणी रद्द करण्यास सभासदांनी तीव्र विरोध दर्शविला.

ठळक मुद्देअंतिम सभा : सभासद आक्रमक; मुदतवाढ फेटाळल्याची माहिती

सिन्नर : सिन्नर व्यापारी सहकारी बँकेवर अवसायक नेमण्याच्या कार्यवाहीस दहा वर्षे पूर्ण झाल्याने कायद्यातील तरतुदीनुसार या बँकेची नोंदणी रद्द करण्यासाठी अवसायक एस.पी. रुद्राक्ष यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहात अंतिम सर्वसाधारण सभा झाली. तथापि, नोंदणी रद्द करण्यास सभासदांनी तीव्र विरोध दर्शविला.या बँकेचे पतसंस्था म्हणून अस्तित्व टिकवावे किंवा एखाद्या पतसंस्थेत विलीनीकरण करण्यात यावे, असा प्रस्तावही सभासदांनी मांडला. सन २००९ मध्ये रिझर्व्ह बँकेने बँकेची नोंदणी रद्द करण्याची कार्यवाही केली व सहकार खात्याने बँकेवर अवसायकाची नेमणूक केलेली आहे. सभेचे अध्यक्ष रुद्राक्ष यांनी विषयांचे वाचन केले. त्याच दरम्यान सभासदांना नोटिसाच मिळालेल्या नसल्याच्या कारणास्तव सभा रद्द करण्यात यावी, अशी मागणी काही सभासदांनी लावून धरली. रुद्राक्ष यांनी विषय वाचन होऊ द्यावे, त्यानंतर लेखी स्वरूपात म्हणणे मांडावे, अशी सूचना केल्यानंतर सभेला सुरुवात झाली. अवसायक म्हणून मुदतवाढ मिळावी, असा प्रस्ताव जिल्हा उपनिबंधकांकडे पाठविला होता. तथापि, तो फेटाळण्यात आल्याची माहिती रुद्राक्ष यांनी दिली.दरम्यान, ज्येष्ठ सभासद कृष्णाजी भगत यांनी या संस्थेने गोरगरिबांचे संसार उभे केलेले आहेत. त्यामुळे एखाद्या चांगल्या पतसंस्थेत विलीनीकरण केल्यास संस्था सुरळीत चालू शकेल, असे सांगितले. डॉ. जी.एल. पवार यांनी ही एक बँक अवसायनात गेल्यामुळे शहरात २० बँका आल्याचे नमूद केले. या संस्थेबद्दल सगळ्यांना आपुलकी असल्याने कायदा मोडून संस्था वाचवावी व सभासदांना दिलासा द्यावा तर अ‍ॅड. शिवाजी देशमुख यांनी नोंदणी रद्दच्या हुकूमाविरोधात किमान दोन हजार ३०० सभासदांच्या सह्यांचा अर्ज जिल्हा उपनिबंधकांकडे व राज्याच्या सहकार मंत्र्यांकडे द्यावा लागेल, अशी माहिती दिली.भाऊसाहेब शिंदे यांनी, बँकेचे लेखापरीक्षण अहवाल अवलोकनार्थ सभेत ठेवायला हवे होते, असे सांगितले. कायद्याच्या कसोटीत तडकाफडकी निर्णय घेऊन बँकेची नोंदणी रद्द करू नये, सभेत सभासदांनी मांडलेल्या भावना सहकार विभागातील वरिष्ठांपर्यंत पोहोचवाव्यात, अशी अपेक्षा प्रा.आर.के. मुंगसे यांनी व्यक्त केली. नामकर्ण आवारे यांनी मनोगत व्यक्त केले.जमा-खर्च मंजुरीचा विषय फेटाळलाबँकेचा गेल्या काही वर्षातला जमा-खर्च व ताळेबंदाला मंजुरीचा विषय सभासदांनी बहुमताने फेटाळला. लेखापरीक्षण अहवाल तसेच जमा-खर्च व ताळेबंद आम्हाला बघायला मिळालेला नसल्याने मंजुरी देता येणार नाही, अशी भूमिका सभासदांच्या वतीने किरण मुत्रक यांनी मांडली. उपस्थित सर्व सभासदांनी हात वर करून त्यास अनुमोदन दिले. दरम्यान, यावेळी रुद्राक्ष यांनी लेखी द्या, अशी आग्रही मागणी केली. तथापि, सभेच्या इतिवृत्तात तशी नोंद करा. प्रत्येकवेळी सभासदांची अडवणूक करू नका, असे माजी नगरसेवक मेहमूद दारूवाला, सोनल लहामगे यांनी सांगितले. त्यानंतर रुद्राक्ष यांनी बँक कर्मचाऱ्याला इतिवृत्त लिहिण्यास सांगितले. 

टॅग्स :bankबँकsinnar-acसिन्नर