शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

सिन्नर आता तीन दिवस पूर्ण बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2020 23:02 IST

सिन्नर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात अत्यावश्यक सेवावगळता लॉकडाउन केलेला असताना शहर परिसरात भाजीपाला, किरणा दुकाने, मेडिकल सुरू असल्याने नागरिक घराबाहेर पडत आहेत. भविष्यात कोरोनाचं भय इथलं संपत नाही अशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी खबरदारी म्हणून मेडिकलवगळता भाजीपाला, किराणा दुकानांसह सर्वच दुकाने आठवड्यातून ३ दिवस शुक्रवार, शनिवार व रविवारी बंद ठेवण्याच्या सूचना आमदार माणिकराव कोकाटे यांनी प्रशासनाला दिल्या.

सिन्नर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात अत्यावश्यक सेवावगळता लॉकडाउन केलेला असताना शहर परिसरात भाजीपाला, किरणा दुकाने, मेडिकल सुरू असल्याने नागरिक घराबाहेर पडत आहेत. भविष्यात कोरोनाचं भय इथलं संपत नाही अशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी खबरदारी म्हणून मेडिकलवगळता भाजीपाला, किराणा दुकानांसह सर्वच दुकाने आठवड्यातून ३ दिवस शुक्रवार, शनिवार व रविवारी बंद ठेवण्याच्या सूचना आमदार माणिकराव कोकाटे यांनी प्रशासनाला दिल्या. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक खबरदारी, उपाययोजना तसेच तालुक्यातील टंचाई परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंचायत समितीच्या सभागृहात झालेल्या या बैठकीस आमदार कोकाटे बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य सीमंतिनी कोकाटे, तहसीलदार राहुल कोताडे, सिन्नरचे पोलीस निरीक्षक साहेबराव पाटील, एमआयडीसीचे पोलीस निरीक्षक अशोक रहाटे, वावीचे सहाय्यक निरीक्षक रणजित गलांडे, गटविकास अधिकारी लता गायकवाड, मुख्याधिकारी संजय केदार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन बच्छाव आदी उपस्थित होते.कोरोनाच्या विरोधातील भविष्यातील लढाईसाठी उपजिल्हा रुग्णालयात डेडीकेटेड कोरोना हेल्थ केअर सेंटर उभारण्यात येत असून, १०० कॉटची व्यवस्था करण्यात आली असून, सिन्नर महाविद्यालयाच्या आवारातील डी.एड. कॉलेज व मुलींच्या वसतिगृहात कोव्हीड-१९ केअर सेंटर सुरू करण्यात येत असल्याचे आरोग्य अधिकारी डॉ. मोहन बच्छाव यांनी सांगितल्यानंतर नगरपालिका, पंचायत समिती तसेच सामाजिक संस्थांच्या माध्यमातून ४०० बेडची व्यवस्था करण्यासंदर्भात आमदार कोकाटे यांनी सूचना दिल्या. कोव्हीड-१९ केअर सेंटरमध्ये दाखल झालेल्या रुग्णाचा स्वॅब घेण्यासाठी स्थानिक लॅब टेक्निशियन घ्यावा, तसेच स्वॅब तपासणीसाठी नाशिकला न जाता येथून थेट पुण्याला पाठविण्याची व्यवस्था करा, असेही ते म्हणाले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जगदाळे यांच्याशी मोबाइलद्वारे संपर्क साधून त्यांना याबाबत सूचित केले. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब वाघ, शहराध्यक्ष नामदेव कोतवाल, माजी नगराध्यक्ष विठ्ठलराजे उगले, पंचायत समितीचे विरोधी पक्षनेते विजय गडाख, पंचायत समिती सदस्य रवि पगार, तातू जगताप तसेच बाबा कांदळकर, पी. जी. आव्हाड आदींसह अधिकारी उपस्थित होते.दरम्यान, शहर बंद ठेवण्याबाबत तहसीलदार राहुल कोताडे यांच्या उपस्थितीत सोमवारी सकाळी नगराध्यक्ष किरण डगळे, मुख्याधिकारी संजय केदार, किराणा व्यापारी व मटन विक्रेत्यांचे प्रतिनिधी यांची चर्चा झाली होती. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी उपाययोजनेचा भाग म्हणून शहरातील किराणा व्यापारी, मटन विक्रेत्यांचे प्रतिनिधी यांनी स्वयंस्फूर्तीने दर आठवड्याला शुक्रवार, शनिवार व रविवार असे तीन दिवस अत्यावश्यक सेवावगळून शंभर टक्के बंद पाळण्याबाबत सकारात्मक पाऊल उचलले होते. या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यामुळे पुढील निर्णय होईपर्यंत शहरातील किराणा दुकाने, भाजी बाजार, मटन शॉप आठवड्यात केवळ चारच दिवस सुरू राहतील.------कारवाईचा बडगा उगारालॉकडाउनच्या काळात सर्वांनी घरात थांबणे गरजेचे असताना नागरिक बेपर्वाई करत असून, भाजीपाला, किराणा, औषधे घेण्याच्या बहाण्याने शहरभर फिरत आहेत. यापूर्वी आठवडे बाजाराची संकल्पना होती. तालुकाभरातून नागरिक आठवडाभराच्या जीवनावश्यक वस्तू घेऊन जात असत, मात्र आता दररोज भाजीपाला, किराणा कसा लागतो? प्रशासनाने याला आवर घालण्यासाठी कडक धोरण अवलंबवावे. भाजी बाजार, किराणा दुकानांसह सर्व सेवा तीन दिवस बंद ठेवाव्यात. केवळ मेडिकल सुरू राहतील. औषधी घेण्यासाठी येणाऱ्याकडे डॉक्टरांचे प्रिस्क्रीप्शन तपासावे, संचारबंदीचे उल्लंघन करणाºया दुकानदारांचे परवाने रद्द करा अशा कडक सूचना आमदार कोकाटेंनी प्रशासनाला केल्या. दूध वितरणासाठी सकाळी ६ ते ९ व सायंकाळी ६ ते ८ अशा वेळा निश्चित करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

टॅग्स :Nashikनाशिक