सिन्नर नगर परिषद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:13 IST2021-04-15T04:13:24+5:302021-04-15T04:13:24+5:30

सिन्नर : येथील नगर परिषदेतर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या ...

Sinnar Municipal Council | सिन्नर नगर परिषद

सिन्नर नगर परिषद

सिन्नर : येथील नगर परिषदेतर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते वावीवेस भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष किरण डगळे, गटनेते हेमंत वाजे, नगरसेवक पंकज मोरे, सोमनाथ पावसे, विजय जाधव, रुपेश मुठे, श्रीकांत जाधव उपस्थित होते. सिन्नर येथील सार्वजनिक वाचनालयात संचालक मनीष गुजराथी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात डाॅ. आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी विजय खर्डे, अंबादास भालेराव, विकास उकाडे, सचिन पांगरकर उपस्थित होते.

-------------------------

सिन्नर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्यावेळी माजी आमदार राजाभाऊ वाजे, नगराध्यक्ष किरण डगळे, हेमंत वाजे, विजय जाधव, पंकज मोरे, रुपेश मुठे, श्रीकांत जाधव आदी उपस्थित होते. (१४ सिन्नर २)

===Photopath===

140421\14nsk_34_14042021_13.jpg

===Caption===

१४ सिन्नर २

Web Title: Sinnar Municipal Council

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.