सिन्नरला स्वयंस्फूर्तीने बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2018 16:15 IST2018-08-09T16:15:10+5:302018-08-09T16:15:37+5:30

सिन्नर : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने सिन्नर येथील तहसील कार्यालयासमोर दिवसभर ठिय्या आंदोलन करण्यात आले. शहरात व्यावसायिकांनी स्वयंस्फूर्तीने बंद पाळला. शहरासह ग्रामीण भागात ग्रामस्थांनी बंद पाळून मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी पाठींबा दिला. वावी व परिसरातील ग्रामस्थांनी वावी येथे भव्य मोर्चा काढून कडकडीत बंद पाळला. वावीसह पांगरी, पाथरे, पांढुर्ली या गावांमध्ये स्वयंस्फूर्तीने कडकडीत बंद पाळण्यात आला.

 Sinnar has been swiftly closed | सिन्नरला स्वयंस्फूर्तीने बंद

सिन्नरला स्वयंस्फूर्तीने बंद

ठळक मुद्देसिन्नर शहरात मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने ठिय्या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले.

सिन्नर : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने सिन्नर येथील तहसील कार्यालयासमोर दिवसभर ठिय्या आंदोलन करण्यात आले. शहरात व्यावसायिकांनी स्वयंस्फूर्तीने बंद पाळला. शहरासह ग्रामीण भागात ग्रामस्थांनी बंद पाळून मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी पाठींबा दिला. वावी व परिसरातील ग्रामस्थांनी वावी येथे भव्य मोर्चा काढून कडकडीत बंद पाळला. वावीसह पांगरी, पाथरे, पांढुर्ली या गावांमध्ये स्वयंस्फूर्तीने कडकडीत बंद पाळण्यात आला.
सिन्नर शहरात मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने ठिय्या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले. शांततेच्या मार्गाने दिवसभर ठिय्या आंदोलन करण्यात आले. तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ भव्य मंडप उभारुन मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले, गोविंद लोखंडे, प्रा. आर. के. मुंगसे, राजाराम मुरकुटे, पंकज जाधव, नामदेव कोतवाल, कृष्णा कासार, हरिभाऊ तांबे, राजेंद्र घोरपडे, डी. डी. गोर्डे, हर्षद देशमुख, शरद शिंदे, किरण खाडे, जयराम शिंदे, अण्णासाहेब गडाख, सोमनाथ भिसे, अ‍ॅड. राजेंद्र चव्हाणके, सोमनाथ तुपे यांच्यासह शेकडो मराठा समाज बांधवांनी ठिय्या आंदोलनात सहभाग घेतला होता. महिलांनी ठिय्या आंदोलनास हजेरी लावून आपला पाठींबा दर्शविला. आमदार राजाभाऊ वाजे, जिल्हा परिषद सदस्य सीमंतीनी कोकाटे, अण्णासाहेब गडाख, भाजपा व शिवसेनेचे नगरसेवक यांनी ठिय्या आंदोलनास हजेरी लावून आपला पाठींबा दिला. ठिय्या आंदोलनाप्रसंगी लोकप्रतिनिधी, विविध पक्ष व संघटनांचे कार्यकर्ते येऊन आंदोलनास पाठींबा दर्शवित मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी मनोगत व्यक्त करीत होते. शाहीर स्वप्निल डुंबरे यांच्यासह अनेकजण पोवाडे व गीते सादर करुन कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवितांना दिसून आले. पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. दरम्यान, शहरातील व्यावसायिक व व्यापाऱ्यांनी आपली दूकाने व कार्यालये बंद ठेवून आंदोलनास पाठींबा दर्शविला.

Web Title:  Sinnar has been swiftly closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.