लोकमत न्यूज नेटवर्कसिन्नर : विधानसभेची निवडणूक पार पडल्यानंतर गुरूवारी होणाºया मतमोजणीकडे सिन्नर मतदार संघातील नागरिकांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. सिन्नर तहसील कार्यालयात होणाºया मतमोजणीची तयारी पूर्ण झाली असून दुपारी बारा ते एक वाजेपर्यंत निकाल अपेक्षीत आहे.निवडणूक निर्णय अधिकारी ज्योती कावरे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार राहुल कोताडे,सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मुख्याधिकारी व्यकंटेश दुर्वास, गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सिन्नर तहसील कार्यालयात १४ टेबलवर २३ फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार आहे.मतमोजणीसाठी निवडणूक कर्मचारी सज्ज झाले असून सकाळी ८ वाजता मतमोजणीला प्रारंभ होणार आहे. स्ट्रॉँगरुममधून मतदान मशीन बाहेर काढल्यानंतर प्रत्येक टेबलवर चार कर्मचारी या मतदान मशीनवरील आकडे मोजणार आहे. प्रत्येक उमेदवाराचा एक प्रतिनिधी प्रत्येक टेबलवर हजर राहणार आहे. १ क्रमांकापासून ३२१ बूथपर्यंत मतमोजणी होईल.मतमोजणी टेबलवर मतमोजणी पर्यवेक्षक, मतमोजणी सहाय्यक, आणि सूक्ष्मनिरीक्षक असे तीन कर्मचारी राहणार आहे. तीन ते चार तासांमध्ये मतमोजणी पूर्ण होऊन दुपारी बारा ते एक वाजेपर्यंत निकाल लागण्याची अपेक्षा आहे.मतमोजणीसाठी सिन्नर पोलिसांसह निमलष्करी दलाचे जवान तैनात असणार आहे.
सिन्नरला मतमोजणीसाठी १४ टेबलवर २३ फेऱ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2019 22:23 IST
सिन्नर : विधानसभेची निवडणूक पार पडल्यानंतर गुरूवारी होणाºया मतमोजणीकडे सिन्नर मतदार संघातील नागरिकांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. सिन्नर तहसील कार्यालयात होणाºया मतमोजणीची तयारी पूर्ण झाली असून दुपारी बारा ते एक वाजेपर्यंत निकाल अपेक्षीत आहे.
सिन्नरला मतमोजणीसाठी १४ टेबलवर २३ फेऱ्या
ठळक मुद्देमतमोजणीसाठी सिन्नर पोलिसांसह निमलष्करी दलाचे जवान तैनात