सिन्नरला घरफोडीत दीड लाखाचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:13 IST2021-05-16T04:13:38+5:302021-05-16T04:13:38+5:30

सिन्नर : येथील एस. टी. कॉलनीमध्ये फिरोज अय्युब शेख यांच्या घरात गुरुवारी (दि. १३) मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी घरफोडी करून ...

Sinnar gets Rs 1.5 lakh in burglary | सिन्नरला घरफोडीत दीड लाखाचा ऐवज लंपास

सिन्नरला घरफोडीत दीड लाखाचा ऐवज लंपास

सिन्नर : येथील एस. टी. कॉलनीमध्ये फिरोज अय्युब शेख यांच्या घरात गुरुवारी (दि. १३) मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी घरफोडी करून अंदाजे दीड लाखाचा ऐवज लंपास केला. त्यात रोख रुपये ३० हजार रुपये, दोन ते तीन तोळे सोन्याचे दागिने, चांदीच्या अंगठ्या व अँड्रॉईड मोबाईलचा समावेश आहे. अय्युब शेख यांचा उद्योग भवन परिसरात गॅस वेल्डिंगचा व्यवसाय असून, ते एस. टी. कॉलनीत राहतात. शेख हे मूळचे श्रीरामपूर (ता. अहमदनगर) येथील रहिवासी असून, रमजान ईदसाठी गावी गेले होते. हीच संधी साधून चोरट्यांनी पुढच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश करत चोरी केली. घरातील कपाट व अन्य साहित्य अस्ताव्यस्त केल्याचे आढळून आले. शुक्रवारी सकाळी शेख यांच्या घराचे मागचे दार उघडे असल्याचे शेजाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी याबाबत शेख यांना कळवले.

---------------------

सिन्नर येथील एस. टी. कॉलनीमध्ये चोरट्यांनी पुढच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश करत चोरी केली. (१५ सिन्नर २)

===Photopath===

150521\15nsk_3_15052021_13.jpg

===Caption===

१५ सिन्नर २

Web Title: Sinnar gets Rs 1.5 lakh in burglary