सूर्यवंशी चषकावर सिन्नरने कोरले नाव तालुका क्रिकेट स्पर्धांचा समारोप
By Admin | Updated: November 8, 2014 23:56 IST2014-11-08T23:55:02+5:302014-11-08T23:56:49+5:30
सूर्यवंशी चषकावर सिन्नरने कोरले नाव तालुका क्रिकेट स्पर्धांचा समारोप

सूर्यवंशी चषकावर सिन्नरने कोरले नाव तालुका क्रिकेट स्पर्धांचा समारोप
नाशिक - कै. किशोर सूर्यवंशी स्मृती चषक आंतर तालुका टष्ट्वेंटी टष्ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत सटाणा संघावर सहज विजय मिळवत सिन्नर तालुका क्रिकेट संघाने चषकावर आपले नाव कोरले़ गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या या स्पर्धांचा आज समारोप झाला़ हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते़ आज झालेल्या अंतिम सामन्याचे नाणेफेक किशोर सूर्यवंशी मेमोरियल ट्रस्टचे संचालक राजेंद्र सूर्यवंशी यांच्या हस्ते झाले़ अंतिम सामन्याचे नाणेफेक जिंकून सटाणाच्या संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला़ या संघाने निर्धारित २० षटकांत ७ बाद ११३ धावा करत सिन्नर समोर ११४ धावांचे लक्ष्य ठेवले़ यामध्ये सटाणाच्या संदीप अहिरे याने ३५, आरिफ खान याने २८ धावा करत योगदान दिले़ सिन्नरचे गोलंदाज शिवा जगताप याने ३, महेश डावरे २, तर रवींद्र जाधव याने एक विकेट घेतल्या़ प्रत्युत्तरादाखल उतरलेल्या सिन्नर संघाच्या फलंदाजांनी प्रथमपासून आत्मविश्वासपूर्वक सुरुवात केली़ आघाडीचा फलंदाज समीर सय्यद याने षटकार, चौकार मारत दमदार ४० धावा ठोकल्या, तर त्याला सागर पवार (३९) व राहुल शिंदे (१०) धावा करत त्याला मोलाची साथ दिली़ सिन्नर संघाने अवघ्या १४़४ षटकांत तीन गड्यांच्या मोेबदल्यात हे लक्ष सहज पार केले़ या सामन्यात पंच म्हणून रामदास रघुवंशी व इम्रान शेख यांनी काम पाहिले़