सिन्नर महाविद्यालयाचे खेळाडू राज्य पातळीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 06:31 PM2019-10-14T18:31:14+5:302019-10-14T18:31:38+5:30

सिन्नर येथील महाविद्यालयाने विभागीय कुस्ती स्पर्धेत यश मिळवून राज्य पातळीवर प्रवेश मिळविला आहे.

Sinnar College players at the state level | सिन्नर महाविद्यालयाचे खेळाडू राज्य पातळीवर

सिन्नर महाविद्यालयाच्या खेळाडू सीमा लहाने व पल्लवी तपासे यांची राज्य कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल सत्कार करताना प्राचार्य डॉ. दिलीप शिंदे. समवेत क्रीडाशिक्षक एल.एस. कांदळकर आदी.

Next

सिन्नर : येथील महाविद्यालयाने विभागीय कुस्ती स्पर्धेत यश मिळवून राज्य पातळीवर प्रवेश मिळविला आहे.
जिल्हा क्रीडा अधिकारी व जिल्हा क्रीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने विभागीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कुस्ती स्पर्धेत सिन्नर महाविद्यालयाच्या सीमा लहाने व पल्लवी तपासे यांनी उत्कृष्ट कामगिरी करत यश मिळविले. पुणे जिल्ह्यातील खेड येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली आहे. या दोन्ही कुस्तीपटूंचा प्राचार्य डॉ. दिलीप शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मविप्र समाज संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार, डॉ. तुषार शेवाळे, माणिकराव बोरस्ते, राघो अहिरे, डॉ. सुनील ढिकले, सिन्नर तालुका संचालक हेमंत वाजे यांनी कौतुक केले. विद्यार्थिनींना क्रीडाशिक्षक एल. एस. कांदळकर, पी, एम खैरनार यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी उपप्राचार्य डॉ. डी. एस. जाधव, प्रा. आर. व्ही. पवार, प्रा. आर. टी. गुरुळे यांच्यासह शिक्षक उपस्थित होते.

Web Title: Sinnar College players at the state level

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.