सिन्नरला दोन ठिकाणी घरफोडी; चार लाखांचा ऐवज लांबविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:36 IST2020-12-04T04:36:35+5:302020-12-04T04:36:35+5:30
विजयनगर परिसरात न्यू सिटी हाइट या अपार्टमेंटमध्ये सोमनाथ आनंदराव कासट (६३) हे व्यापारी वास्तव्यास असून, काही कामानिमित्त ते ...

सिन्नरला दोन ठिकाणी घरफोडी; चार लाखांचा ऐवज लांबविला
विजयनगर परिसरात न्यू सिटी हाइट या अपार्टमेंटमध्ये सोमनाथ आनंदराव कासट (६३) हे व्यापारी वास्तव्यास असून, काही कामानिमित्त ते बाहेर गेलेेले असल्याने घराला कुलूप होते. अज्ञात चोरट्यांनी संधी साधत सकाळी साडेनऊ ते साडेबारा वाजेदरम्यान कासट यांच्या घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. घरातील कपाट फोडून त्यातील ३० हजार रुपये किमतीच्या चार ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या ४ अंगठ्या आणि ५० हजार रुपये रोख रक्कम असा एकूण ८० हजारांचा ऐवज चोरून नेला. कासट यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी सिन्नर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याबाबत अज्ञात चोरट्यांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक रामदास धुमाळ करत आहेत.
दुसरी घटनेत औद्योगिक वसाहतीलगत असलेल्या उज्ज्वलनगरमध्ये राहणारे बिरजू राजाराम पाल (४८) यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी सकाळी साडेसात वाजेदरम्यान प्रवेश करत स्क्रू=ड्रावरच्या साह्याने कपाट उघडले. या कपाटातून तीन लाख रुपयांची रोकड लंपास केली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करत आहेत.