सिन्नरला पाचवर्षीय मुलीला कोरोनाची बाधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 23:12 IST2020-05-05T21:30:39+5:302020-05-05T23:12:40+5:30
सिन्नर : तालुक्यातील वडगाव - सिन्नर येथील पाचवर्षीय मुलीला कोरोनाची लागण असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे सिन्नरची रु ग्णसंख्या पाच झाली आहे.

सिन्नरला पाचवर्षीय मुलीला कोरोनाची बाधा
सिन्नर : तालुक्यातील वडगाव - सिन्नर येथील पाचवर्षीय मुलीला कोरोनाची लागण असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे सिन्नरची
रु ग्णसंख्या पाच झाली आहे. गेल्या आठवड्यात वडगाव सिन्नर येथील सदर कुटुंबातील ३२ वर्षीय युवक कोरोनाबाधित म्हणून मिळून आला होता. मुंबई संपर्कात असलेल्या बत्तीस वर्षे युवक कोरोनाबाधित आढळून आल्यानंतर त्याच्या २७ निकटवर्तीयांना क्वॉरण्टाइन करण्यात आले होते. मंगळवारी सकाळी त्याच कुटुंबातील पाचवर्षीय मुलीला कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. कोरोनाबाधित ३२ वर्षीय युवकाच्या संपर्कातील इतर २५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहन बच्छाव यांनी दिली. त्यामुळे प्रशासनाला काहीसा दिलासा मिळाला असला तरी पाच वर्षे बालिकेला कोरोनाची लागण असल्याने सिन्नरकरांच्या चिंतेत भर पडली आहे. एका रूग्णाचा अहवाल प्रलंबित आहे.