सिन्नरला२७ रुग्णांची वाढ; एकुुण रुग्णसंख्या ७४०
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 00:28 IST2020-08-09T21:25:10+5:302020-08-10T00:28:34+5:30
सिन्नर: शहरासह तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसागणिक वाढतच असून रविवारी सायंकाळपर्यंत २७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या ७४० वर पोहचली आहे.

सिन्नरला२७ रुग्णांची वाढ; एकुुण रुग्णसंख्या ७४०
सिन्नर: शहरासह तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसागणिक वाढतच असून रविवारी सायंकाळपर्यंत २७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या ७४० वर पोहचली आहे.
आरोग्य विभागाला रविवारी प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये शहरातील १४ तर ग्रामीण भागातील १३ असे एकुण २७ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहे. शहरातील कानडी मळ्यात ४ रुग्ण आढळले असून त्यात ३५ व ७२ वर्षीय पुरुष, ३२ वर्षीय महिला व १३ वर्षीय मुलीचा समावेश आहे. शिवाजी नगरमध्ये 3 रुग्ण आढळले असून त्यात पुरुष व तरुणीचा समावेश आहे. संजीवनी नगरमध्ये पुरुष, कमल नगर तरुण, देवी रोड पुरुष, लोंढे गल्ली तरुण, साईदत्त नगर तरुण, एसटी कॉलनी पुरुष, आकृती नगर पुरुष तर ग्रामीण भागात दापुर येथे ३ रुग्ण वाढले असून त्यात महिला, तरुण व मुलाचा समावेश आहे. सरदवाडी येथे मुलगी व पुरुष बाधित आले आहेत. मानोरी येथे पुरुष, र्निहाळेत तरुण, मुसळगाव एमआयडीसी तरुण, ठाणगाव महिला, चिंचोली युवक व पुरुष, सोनांबे महिला, मापरवाडी पुरुष असे तालुक्यात एकुण २७ रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे तालुक्यात एकुण ७४० कोरोना बाधितांची संख्या झाली आहे. आत्तापर्यंत ५२९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून १७ जणांचा मृत्यू तर १९४ रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन बच्छाव, नोडल अधिकारी डॉ. लहू पाटील, ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयाच्या अधिक्षिका डॉ. निर्मला गायकवाड, नगरपालिका दवाखान्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत खैरनार यांनी दिली.