शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
3
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
4
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
5
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
6
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
7
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
8
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...
9
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
10
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
11
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
12
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
13
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
14
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
15
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
16
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
17
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
18
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
19
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
20
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम

एकेरी वाहतूक करण्याचा प्रयोग: शाळकरी मुलांना दुहेरी त्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 01:25 IST

अशोकस्तंभ ते त्र्यंबकनाका रस्त्याचा ‘स्मार्ट विकास’ साधला जात आहे. पहिल्या टप्प्यात काम सुरू असल्याने शहर वाहतूक शाखेने अशोकस्तंभ ते थेट त्र्यंबक नाक्यापर्यंत एकेरी वाहतूक करण्याचा प्रयोग सलग दुसऱ्या दिवशी बुधवारी (दि. २४) राबविला. त्यामुळे दुसºया दिवशीही या प्रयोगाचा सर्वाधिक त्रास शाळकरी विद्यार्थी व पालकांना सहन करावा लागला. सिग्नलवरूनच विद्यार्थ्यांना शालेय वाहनातून उतरण्यास भाग पडले. तसेच पालकांनीही दुचाकी उभ्या करून पायी चालत शाळेचे प्रवेशद्वार गाठले.

नाशिक : अशोकस्तंभ ते त्र्यंबकनाका रस्त्याचा ‘स्मार्ट विकास’ साधला जात आहे. पहिल्या टप्प्यात काम सुरू असल्याने शहर वाहतूक शाखेने अशोकस्तंभ ते थेट त्र्यंबक नाक्यापर्यंत एकेरी वाहतूक करण्याचा प्रयोग सलग दुसऱ्या दिवशी बुधवारी (दि. २४) राबविला. त्यामुळे दुसºया दिवशीही या प्रयोगाचा सर्वाधिक त्रास शाळकरी विद्यार्थी व पालकांना सहन करावा लागला. सिग्नलवरूनच विद्यार्थ्यांना शालेय वाहनातून उतरण्यास भाग पडले. तसेच पालकांनीही दुचाकी उभ्या करून पायी चालत शाळेचे प्रवेशद्वार गाठले. सीबीएस येथून त्र्यंबक नाका दरम्यान मोठी प्राथमिक व माध्यमिक शाळा आहे. या शाळेची विद्यार्थिसंख्या अधिक असून, शाळा सुटणे व भरण्याची वेळ सकाळी साडेअकरा व बारा वाजेची असल्याने विद्यार्थ्यांची वर्दळ सुरू होती. त्याचवेळी एकेरी वाहतुकीचा प्रयोग राबविण्यास शहर वाहतूक पोलिसांकडून सुरुवात करण्यात आल्याने विद्यार्थ्यांची तारांबळ अधिक उडाली. भर रस्त्यात सिग्नलजवळ शालेय विद्यार्थी वाहतूक करणाºया वाहनांना थांबून तेथेच विद्यार्थ्यांना उतरवून देण्यात आले. तेथून पुढे बॅरिकेडच्या अडथळ्यांची शर्यत पार करून विद्यार्थ्यांनी शाळा गाठली.वाहनांच्या लांबच लांब रांगामंगळवारी वाहतूक शाखेच्या प्रयोगाचा पहिला दिवस गोंधळातच संपला. दुसºया दिवशीही वाहतूक कोंडी निर्माण होऊन वाहतूक व्यवस्थेचा फज्जा उडाल्याने चित्र होते.मेहेर सिग्नल ते सीबीएस सिग्नलपर्यंत व त्र्यंबक नाका ते सीबीएसपर्यंत दुहेरी वाहतूक दुपारी बारा वाजेपर्यंत सुरू होती. त्यानंतर बॅरिकेड्स लावून अशोकस्तंभाकडून सीबीएसकडे जाणारी वाहतूक थांबविण्यात आली. तसेच सीबीएस येथून त्र्यंबक नाक्याकडे जाण्यासाठी वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला. यामुळे दुपारी साडेबारा वाजेनंतर सीबीएसवर शरणपूररोड, शालिमारच्या दिशेने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.मुंबई नाक्याकडून अशोकस्तंभाकडे जाणाºया वाहनांना दुपारी नव्या अधिसूचनेनुसार प्रवेश दिला जात होता.नाशिककरांनी दुसºया दिवशीही पोलिसांचे नियोजन व नव्या बदलाविषयी तीव्र संताप व्यक्त केला. यावेळी वाहनचालकांचे वाहतूक पोलिसांसोबत खटके उडताना दिसून आले.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीस