सिडकोत शिवजयंतीनिमित्त एकच मिरवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 00:52 IST2020-02-13T23:31:36+5:302020-02-14T00:52:39+5:30
सिडकोत एकच शिवजयंती समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, सिडको सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी भूषण कदम, तर महिला मंडळ अध्यक्षपदी नगरसेवक हर्षा बडगुजर व नगरसेवक किरण गामणे यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती नगरसेवक मुकेश शहाणे व संजय भामरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सिडकोत शिवजयंतीनिमित्त एकच मिरवणूक
सिडको : सिडकोत एकच शिवजयंती समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, सिडको सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी भूषण कदम, तर महिला मंडळ अध्यक्षपदी नगरसेवक हर्षा बडगुजर व नगरसेवक किरण गामणे यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती नगरसेवक मुकेश शहाणे व संजय भामरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शिवजयंतीनिमित्त सिडकोत एकच मिरवणूक व विविध कार्यक्र मांचे आयोजन केले आहे. येथील साईबाबानगर येथे नगरसेवक मुकेश शहाणे व संजय भामरे यांच्या नेतृत्वाखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीत सिडको सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती २०२०ची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.
यात समितीच्या अध्यक्षपदी भूषण कदम, उपाध्यक्षपदी गोरख शिंदे, कुणाल गोसावी, राहुल गणोरे, अतुल जाधव, स्वप्नील नेटावणे, बाळासाहेब गिते, कार्याध्यक्षपदी पवन कातकाडे, गणेश अरिंगळे, खजिनदार म्हणून अमर वझरे, सरचिटणीस अर्जुन वेताळ, गौरव केदारे, संजय जाधव, पवन मटाले, सहचिटणीसपदी मुकेश शेवाळे, युवराज दराडे, प्रसिद्धीप्रमुख म्हणून योगेश गांगुर्डे, तर महिला समितीत अध्यक्षपदी हर्षा बडगुजर व किरण गामणे यांनी निवड करण्यात आली.
तसेच उपाध्यक्षपदी नगरसेवक छाया देवांग, मनीषा हिरे, कार्याध्यक्षपदी नगरसेवक भाग्यश्री ढोमसे, नगरसेवक कल्पना पांडे, सरचिटणीसपदी सोनल मंडलेचा यांची निवड जाहीर करण्यात आली, तसेच सिडकोतील आजी-माजी नगरसेवकांचा समावेश करण्यात आला आहे. तर मार्गदर्शक म्हणून आमदार सीमा हिरे, मराठा विद्या प्रसारक संस्थेचे संचालक नाना महाले, यांची निवड करण्यात आली.