तरुणाईने साधनेतून घडवावे गाणे

By Admin | Updated: December 6, 2015 23:53 IST2015-12-06T23:52:43+5:302015-12-06T23:53:12+5:30

पं. प्रभाकर कारेकर : राज्यस्तरीय गायन स्पर्धेचे पारितोषिक वितरण

Singing should be done through youthful instruments | तरुणाईने साधनेतून घडवावे गाणे

तरुणाईने साधनेतून घडवावे गाणे

नाशिक : संगीत क्षेत्रातील सध्याची पिढी अत्यंत गुणवान असून, तिने परिश्रमपूर्वक साधना, रियाज करून गाणे घडवावे, अशी अपेक्षा प्रख्यात गायक पं. प्रभाकर कारेकर यांनी व्यक्त केली.
कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय ख्याल गायन व उपशास्त्रीय संगीत स्पर्धेच्या पारितोषिक वितरणप्रसंगी ते बोलत होते. कुसुमाग्रज स्मारकात झालेल्या या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष संजय पाटील, सहकार्यवाह अरविंद ओढेकर, अ‍ॅड. विलास लोणारी उपस्थित होते. प्रतिष्ठानच्या वतीने आॅक्टोबरमध्ये ख्याल व उपशास्त्रीय गायनाची स्पर्धा घेण्यात आली होती. ख्याल गायन स्पर्धेत ठाणे येथील रोहित धारप व औरंगाबाद येथील कौस्तुभ कुलकर्णी यांना प्रथम क्रमांकाचे दहा हजार रुपये पारितोषिक (विभागून) जाहीर झाले होते.
औरंगाबाद येथील रोहन गावडे यांनी द्वितीय (सात हजार), तर निहिरा निसर्ग व कुलभूषण कहाळेकर यांनी तृतीय पारितोषिक (पाच हजार, विभागून) पटकावले होते. तसेच उपशास्त्रीय संगीत स्पर्धेत मंगेश कुलकर्णी (जुन्नर) यांनी प्रथम (दहा हजार), रोहन गावडे (औरंगाबाद) यांनी द्वितीय (पाच हजार), तर संतोष देशमुख (राजगुरूनगर) यांनी तृतीय पारितोषिक (तीन हजार) पटकावले होते.
केतकी भट व मंगेश कुलकर्णी यांना उत्तेजनार्थ पारितोषिके (प्रत्येकी एक हजार) जाहीर झाली होती. स्पर्धेचे परीक्षण पं. उपेंद्र भट, आशालता करलगीकर, पं. शंकर वैरागकर, अनिल दैठणकर यांनी केले होते. या सर्व विजेत्यांना पं. प्रभाकर कारेकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. प्रारंभी ज्येष्ठ लेखक मुरलीधर खैरनार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे कार्यवाह प्रा. मकरंद यांनी प्रास्ताविक केले.

Web Title: Singing should be done through youthful instruments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.