शिंगवे उपसरपंचपदी सिंधूबाई गीते बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 01:51 IST2021-02-18T22:53:40+5:302021-02-19T01:51:08+5:30
सायखेडा : शिंगवे युवक विकास आघाडीच्या तीन वर्षांच्या कार्यकाळ नंतर रोटेशन पद्धतीने उपसरपंच धोंडीराम रायते यांनी राजीनामा दिला. या जागेवर सिंधूबाई गीते यांचा एकमेव अर्ज आल्याने यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.

शिंगवे उपसरपंचपदी सिंधूबाई गीते यांच्या बिनविरोध निवड प्रसंगी उपस्थित सरपंच शिवाजी माने, धोंडीराम रायते व इतर.
ठळक मुद्देसिंधूबाई गीते यांचा एकमेव अर्ज आल्याने यांची सर्वानुमते बिनविरोध निवड
सायखेडा : शिंगवे युवक विकास आघाडीच्या तीन वर्षांच्या कार्यकाळ नंतर रोटेशन पद्धतीने उपसरपंच धोंडीराम रायते यांनी राजीनामा दिला. या जागेवर सिंधूबाई गीते यांचा एकमेव अर्ज आल्याने यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी सरपंच शिवाजी माने, माजी उपसरपंच धोंडीराम रायते, विष्णू डेर्ले, शंकर डेर्ले,भास्कर गीते, भाऊलाल कटारे, कचरू शिंदे, सुभाष डेर्ले, भूषण शिंदे, बेबीताई रायते व ग्रामस्थ उपस्थित होते. मनीषा गर्जे ग्रामसेविका यांनी कामकाज पाहिले.