येवल्यात साध्या पद्धतीने गुढीपाडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 10:57 PM2020-03-25T22:57:07+5:302020-03-25T22:57:36+5:30

येवला परिसरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये शासन, प्रशासन यंत्रणा दक्षता घेत असताना नागरिकही स्वत:ची काळजी घेत असल्याचे चित्र दिसून येत आहे. कोरोनाच्या प्रभावामुळे मराठी नववर्षाचा सण असणारा गुढीपाडवाही यंदा सर्वांनीच साधेपणाने साजरा केला. लॉकडाउन व इतर उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रशासन व पोलिस यंत्रणा ‘फिल्ड’वर उतरली आहे.

In a simple way, stir the doll | येवल्यात साध्या पद्धतीने गुढीपाडवा

येवल्यात साध्या पद्धतीने गुढीपाडवा

Next
ठळक मुद्देकोरोनाचे सावट : लॉकडाउनच्या अंमलबजावणीसाठी प्रशासन फिल्डवर

येवला : शहर व तालुका परिसरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये शासन, प्रशासन यंत्रणा दक्षता घेत असताना नागरिकही स्वत:ची काळजी घेत असल्याचे चित्र दिसून येत आहे. कोरोनाच्या प्रभावामुळे मराठी नववर्षाचा सण असणारा गुढीपाडवाही यंदा सर्वांनीच साधेपणाने साजरा केला. लॉकडाउन व इतर उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रशासन व पोलिस यंत्रणा ‘फिल्ड’वर उतरली आहे.
शासनाने जाहीर केलेल्या लॉकडाउनला प्रतिसाद देत अत्यावश्यक सेवावगळता सर्वच व्यावसायिकांनी आपली छोटी-मोठी सर्वच आस्थापने लॉकडाउन केली आहेत. यामुळे शहरातील मुख्य बाजारपेठेसह सर्वच बाजारपेठांमधील रस्ते सुनसान झाले आहेत. शहरवासीयही स्वसुरक्षेसाठी घरातच बसून आहेत. गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी (दि. २४) किराणा दुकाने, मॉलवर गर्दी झाली होती मात्र, बुधवारी (दि. २५) शुकशुकाट राहिला. दैनंदिन भाजीपाला बाजारावरही परिणाम दिसून आला. विशेष म्हणजे मुस्लीम भागात सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन प्रबोधन केल्याने मुस्लीम भागातील हालचालही थंडावली होती. शहरा प्रमाणेच तालुका पोलीस ठाण्याच्या वतीने गवंडगाव टोलनाका येथे नाकाबंदी करण्यात आलेली असून तालुक्यातील ६ पोलीस बीट मध्ये ६ पोलीस पथक तयार करण्यात आली आहेत. या बरोबरच पाटोदा, अंदरसूल, मुखेड, नगरसूल, जळगावनेऊर, राजापूर या गावांमध्ये पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागात गेल्या काही दिवसात पुणे, मुंबईसारख्या मोठ्या शहरातून व परराज्यातून आलेल्यांची तपासणी केली जात असून, यात ज्यांना आवश्यकता आहे, अशांना होम क्वॉरण्टाइनचा सल्ला देण्यात येत आहे. कोपरगाव रोडवरील पिंपळगाव जलाल टोलनाका येथे पोलीस नाकाबंदी करण्यात आली असून, बाहेरील वाहनांची व प्रवाशांची तपासणी पोलीस व वैद्यकीय कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे.

Web Title: In a simple way, stir the doll

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.