११ आॅगस्टला त्र्यंबकेश्वरला सिंहस्थ ध्वजावतरण
By Admin | Updated: July 28, 2016 00:15 IST2016-07-28T00:11:19+5:302016-07-28T00:15:15+5:30
११ आॅगस्टला त्र्यंबकेश्वरला सिंहस्थ ध्वजावतरण

११ आॅगस्टला त्र्यंबकेश्वरला सिंहस्थ ध्वजावतरण
त्र्यंबकेश्वर : सिंहस्थ कुंभमेळ्याचा पर्वकाल पुढील महिन्यात संपणार असून, पुरोहित संघातर्फे उभारण्यात आलेली धर्मध्वजा गुरुचे सिंह राशीतून कन्या राशीत गुरूवार, दि. ११ आॅगस्ट रोजी रात्री ९ वाजून २७ मिनिटांनी पदार्पण होत आहे म्हणजे सिंहस्थ कुंभमेळ्याचा १३ महिन्यांचा पर्वकाल संपणार आहे. या पार्श्वभूमीवर ध्वजावतरणासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे जलसंपदा तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री, नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन उपस्थित राहणार आहेत.
त्र्यंबक नगराध्यक्षा विजया लढ्ढा यांच्या नेतृत्वाखाली त्र्यंबकेश्वर पुरोहित संघाचे अध्यक्ष प्रशांत गायधनी, मनोज थेटे, गिरीश जोशी, आखाडा परिषद अध्यक्ष स्वामी सागरानंद सरस्वती, जुना आखाडा आंतरराष्ट्रीय संरक्षक श्री महंत हरीगिरीजी महाराज, त्र्यंबक नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष संतोष कदम, दीपक लढ्ढा, माजी नगराध्यक्ष सुनील अडसरे, जयराम मोंढे आदिंचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांंना भेटले.