राष्ट्रीय मानांकन स्पर्धेत विक्रांतला रौप्य
By Admin | Updated: May 16, 2014 00:38 IST2014-05-15T21:38:10+5:302014-05-16T00:38:33+5:30
नाशिक : चौदा वर्षे वयोगटातील मुलांच्या राष्ट्रीय मानांकन लॉन टेनिस स्पर्धेत नाशिकच्या विक्रांत मेहता याने उपविजेतेपद पटकावत रौप्यपदाला गवसणी घातली़

राष्ट्रीय मानांकन स्पर्धेत विक्रांतला रौप्य
नाशिक : चौदा वर्षे वयोगटातील मुलांच्या राष्ट्रीय मानांकन लॉन टेनिस स्पर्धेत नाशिकच्या विक्रांत मेहता याने उपविजेतेपद पटकावत रौप्यपदाला गवसणी घातली़
पुणे येथे झालेल्या या स्पर्धेत देशातील अनेक खेळाडूंनी सहभाग घेतला होता़ चौदा वर्षे वयोगटात विक्रांत मेहता याने चमकदार कामगिरी करताना अभिषेक मांगले यास ४-० ने पराभूत केले होते. प्रसन्ना बागडे यास ४-१, प्रणित कुदळेला ६-३ असे पराभूत करत त्याने अंतिम फे रीत प्रवेश केला होता़ अंतिम फे रीत मात्र त्याला गुजरातच्या मादविन कामत याच्याकडून ३-६, ३-६ च्या गोल फ रकाने पराभव स्वीकारावा लागला़ यामुळे त्याला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले़ विक्रांत हा नाशिक जिमखान्याचा खेळाडू असून, त्यास प्रशिक्षक राकेश पाटील यांचे मार्गदर्शन लाभते आहे़
फ ोटो - 12 पीएचएमए 07 - विक्रांत मेहता