विभागीय नेमबाजीत गोऱ्हे यांना रौप्य
By Admin | Updated: October 15, 2014 00:48 IST2014-10-15T00:47:29+5:302014-10-15T00:48:13+5:30
विभागीय नेमबाजीत गोऱ्हे यांना रौप्य

विभागीय नेमबाजीत गोऱ्हे यांना रौप्य
नाशिक : मुंबई येथे पार पडलेल्या पश्चिम विभाग राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत नाशिकच्या मोनाली गोऱ्हे यांनी रौप्य पदक पटकावले आहे़ या स्पर्धेत गोऱ्हे यांनी २५ मीटर एअर पिस्तोल प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करताना रौप्य पदकाला गवसणी घातली़ या कामगिरीमुळे दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेसाठी त्यांची राज्याच्या संघात निवड झाली आहे़ गोऱ्हे या एक्सएल टार्गेट असोसिएशन व फ्रावशी इंटरनॅशनल अकॅडमीच्या शूटिंग प्रशिक्षक आहेत़