सिग्नल बनले शोभेची वस्तू
By Admin | Updated: November 23, 2015 23:05 IST2015-11-23T23:04:11+5:302015-11-23T23:05:43+5:30
मुहूर्ताची प्रतीक्षा : वाहतूक कोंडी बनली नित्याची बाब

सिग्नल बनले शोभेची वस्तू
इंदिरानगर :लाखो रुपये खर्च करून बसविण्यात आलेली सिग्नल यंत्रणा अद्याप सुरू न केल्याने शोभिवंत वस्तू बनली आहे. त्यामुळे लहान-मोठ्या अपघातांची संख्या वाढली आहे.वडाळा-पाथर्डी रस्ता आणि मुंबई-आग्रा महामार्गावरील वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता नागरिकांच्या मागणीनुसार लाखो रुपये खर्च करून मुख्य चौफुलीवर सिग्नल यंत्रणा बसविण्यात आली; परंतु अद्यापपर्यंत सिग्नल यंत्रणा सुरू करण्यास मुहूर्त काही लागला नाही. त्यामुळे सिग्नल यंत्रणा शोभिवंत वस्तूच बनली आहे. सिग्नल नसल्याने वाहतुकीचे नियम कोणीही पाळत नाही.
वडाळा-पाथर्डी रस्त्यावरील नागजी चौकात चार मुख्य रस्ते एकत्र येतात. यामध्ये पुणे महामार्ग, मुंबई-आग्रा महामार्ग भाभानगर मार्गे, वडाळा नाका मुंबई-आग्रा महामार्ग आणि इंदिरानगर मार्गे पाथर्डीगाव असे चार मुख्य रस्ते एकत्र येतात. त्यामुळे दिवसभर वाहनांची मोठी वर्दळ सुरू असते. परंतु चौफुली ओलांडायच्या घाईमुळे दररोज लहान-मोठ्या अपघातांमध्ये वाढ होत आहे. सुमारे एक वर्षापूर्वी सिग्नल यंत्रणा बसविण्यात आली होती. परंतु अद्यापपर्यंत ही यंत्रणा सुरूही करण्यात आली नाही आणि पोलीस कर्मचाऱ्याची नेमणूकही करण्यात आलेली नाही.
मुंबईकडून येताना मुख्य प्रवेशद्वार म्हणून पाथर्डीफाटा चौफुलीची ओळख आहे. अंबड औद्योगिक वसाहत, पाथर्डीगाव मार्गे देवळाली कॅम्प, मुंबईकडे आणि नाशिक शहरात असे चार मुख्य रस्ते एकत्र येतात. मुंबई-आग्रा महामार्ग आणि अंबड औद्योगिक वसाहतीत ये-जा करण्यासाठी मुख्य रस्ता असल्याने अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू असते. वाढते अपघात आणि जीवितहानी लक्षात घेता सुमारे दोन वर्षांपूर्वी
सिग्नल यंत्रणा बसविण्यात
आली.
मुहूर्ताची प्रतीक्षा : वाहतूक कोंडी बनली नित्याची बाब