इंदिरानगर परिसरात बिबट्याचे दर्शन?

By Admin | Updated: August 25, 2015 23:59 IST2015-08-25T23:58:51+5:302015-08-25T23:59:40+5:30

इंदिरानगर परिसरात बिबट्याचे दर्शन?

The sight of the leopard in the Indiranagar area? | इंदिरानगर परिसरात बिबट्याचे दर्शन?

इंदिरानगर परिसरात बिबट्याचे दर्शन?

इंदिरानगर : येथील जॉगिंग ट्रॅक परिसरात सोमवारी (दि़२४) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास बिबट्या दिसल्याची परिसरात चर्चा असून, नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे़
सुचितानगरमधील एका सोसायटीमध्ये राहणारे ऋषिकेश वर्मा यांचा आठ वर्षांच्या मुलगा रस्त्यावर खेळत असताना अचानक घाबरलेला अवस्थेत घरात आला व सुमारे अर्धा तासांनी त्याने बिबट्या पाहिल्याचे सांगितले़ दरम्यान, एका भाजीविक्रेत्या महिलेस गवतामध्ये डोळे उंच व पळण्याच्या वेगावरून तो बिबट्या असल्याचे वाटले़ यानंतर नागरिकांनी शोधही घेतला; मात्र या दोघांव्यतिरिक्त कुणीही तो पाहिला नाही़
दरम्यान, यापूर्वी हॉटेल रसोई, आत्मविश्वास सोसायटी व गजानन महाराज मंदिरालगतच्या बंगले परिसरात बिबट्या आल्याच्या घटना घडलेल्या आहेत़ (वार्ताहर)

Web Title: The sight of the leopard in the Indiranagar area?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.