इगतपुरी तालुक्यातील रस्त्यांची चाळण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2020 16:21 IST2020-09-05T16:20:48+5:302020-09-05T16:21:38+5:30
वाडीव-हे : पावसामुळे इगतपुरी तालुक्यातील रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली असून वाहनचालकांची अक्षरशा वाहन चलवतांना त्रेधा तिरपीठ उड़ते आहे.अनेक वेळा अपघात देखील झाले आहेत.सार्वजनिक बांधकाम विभागाने आणि लोकप्रतिनिधि यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

इगतपुरी तालुक्यातील रस्त्यांची चाळण
वाडीव-हे : पावसामुळे इगतपुरी तालुक्यातील रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली असून वाहनचालकांची अक्षरशा वाहन चलवतांना त्रेधा तिरपीठ उड़ते आहे.अनेक वेळा अपघात देखील झाले आहेत.सार्वजनिक बांधकाम विभागाने आणि लोकप्रतिनिधि यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
इगतपुरी हा तालुका पावसाचे माहेरघर म्हणून परिचित आहे. अतिपावसामुळे येथील रस्ते देखील वारंवार खराब होत असतात. दरवर्षी तालुक्यातील विविध रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडलेले असतात. घोटी सिन्नर महामार्ग, घोटी - वैतरणा, वाडिव-हे- आहुर्ली-सांजेगाव,नांदुरवैद्य-मुंढेगाव या मुख्य रस्त्यांची दरवर्षी दयनीय अवस्था होत असते. त्याचप्रमाणे यावर्षी देखील या रस्त्यांची अवस्था बिकट असुन या रस्त्यांवर मोठ मोठे खड्डे पडले आहेत. वाहनचालक,कामगार शेतकरी यामुळे हैराण झाले आहेत.कुंभमेळ्यामध्ये या रस्त्यांचे काम करण्यात आले होते. तेंव्हा पासून ते आजपर्यंत या रस्त्यांची चाळण झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि लोकप्रतिनिधि यांनी या रस्त्यांच्या दुरवस्थेकड़े लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे. या रस्त्यांवर पडलेल्या खड्यांवर तात्पुरता मुलामा सार्वजनिक बांधकाम विभागाकडुन करण्यात येतो मात्र पावसाळ्यामध्ये या रस्त्यांची अवस्था जैसे थेच असते. गेल्या अनेक वर्षांपासुन या रस्त्यांवर ठिक ठिकाणी सोडलेले रस्ते अनेक वर्षांपासुन नविन बनवण्यासाठी प्रलंबीत असुन या रस्त्यांचे तात्पुरता मुलामा न करता कायमस्वरूपी काम करण्याची मागणी त्रस्त वाहनचालक व नागरीक करत आहेत.
दुरूस्तीकडे ठेकेदाराची पाठ
ईगतपुरी तालुक्यातील मुरंबी येथिल मुरंबी फाटा ते गडगडसागवी रस्ता हा अनेक दिवसांपासून नादुस्त अवस्थेत पडुन आहे त्याचा त्रास ग्रामस्थांना होत असुन सदरिल ठेकेदाराने याकठे पाठ फिरवली आहे त्यासंदर्भात आज मनविसेचे जिल्हा उपाध्यक्ष आत्माराम मते, व विधान सभा अध्यक्ष गणेश मुसळे,वाडीव-हे ग्रा.प.सदस्य गोविंद डगळे यांनी आमदार हिरामण खोसकर यांची भेट घेऊन चर्चा केली व निवेदन सादर केले आहे. त्यावर आमदार खोसकर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच काम सुरू करू असे आश्वासन दिले आहे.