शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

खंडित वीजपुरवठ्याने सिडकोवासीय हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 12:51 AM

परिसरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वीजपुरवठा खंडित होत असून, विजेचा प्रश्न तत्काळ सोडविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

सिडको : परिसरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वीजपुरवठा खंडित होत असून, विजेचा प्रश्न तत्काळ सोडविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.  गेल्या काही दिवसांपासून सिडको व परिसरात वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने व ५ ते ६ तास उलटूनही अधिक काळ वीजपुरवठा सुरळीत होत नसल्याने परिसरातील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळा सुरू होण्याअगोदरच विजेचा खेळ खंडोबा सुरू झालेला आहे. दि. ५ जून रोजी गंगापूररोड परिसरामध्ये तब्बल ११ तास वीजपुरवठा खंडित झालेला होता, तर इंदिरानगर परिसरातदेखील सोमवारी रात्री जवळपास दोन ते अडीच तास वीजपुरवठा खंडित झालेला होता तसेच बुधवारी रात्रीच्या वेळेत झालेल्या पावसामुळे सिडको परिसरामध्येदेखील वीजपुरवठा खंडित झाला होता.  सततच्या वीजपुरवठा खंडित होण्याच्या प्रकारामुळे नागरिकांची गैरसोय होत असून, दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी विजेचा शॉक लागून नागरिकांचा बळी जात असल्याच्या घटना घडल्या आहेत.  वीज दुरुस्तीची कामे करताना ज्या परिसरात काम करावयाचे आहे त्याची आगाऊ सूचना वर्तमानपत्रातून नागरिकांना देण्यात यावी, किती तास वीजपुरवठा खंडित ठेवावा लागेल याचीदेखील माहिती नागरिकांना उपलब्ध करून देण्यात यावी. दुरुस्तीच्या नियोजनाव्यतिरिक्त वीजपुरवठा खंडित करू नये अशा सूचना सर्व विभागीय अधिकाऱ्यांना देण्यात याव्यात, अशी मागणी आमदार सीमा हिरे यांनीदेखील निवेदनाद्वारे केली आहे.

टॅग्स :electricityवीज