दाभाडी विद्यालयाजवळ साइडपट्ट्यांची मागणी

By Admin | Updated: February 2, 2016 22:46 IST2016-02-02T22:43:50+5:302016-02-02T22:46:50+5:30

दाभाडी विद्यालयाजवळ साइडपट्ट्यांची मागणी

Sidebar demand near Dabhadhi Vidyalaya | दाभाडी विद्यालयाजवळ साइडपट्ट्यांची मागणी

दाभाडी विद्यालयाजवळ साइडपट्ट्यांची मागणी

गिसाका : दाभाडी येथील टी. आर. हायस्कूलजवळील रस्त्यावर भर टाकून साइडपट्ट्या करण्यात याव्या, अशी मागणी शिक्षक व पालकांनी केली आहे. गिसाका ते दाभाडी रस्त्यावरील विद्यालयाजवळ हा रस्ता अतिशय अरुंद असून, दोन मोठी वाहने एकावेळी पास होऊ शकत नाही. रस्त्याच्या कडेला खूप मोठे खड्डे असल्याने वाहन खाली घेण्यासाठी जागा नाही तसेच साइडपट्ट्याही नाहीत. शाळा सुटल्यावर तसेच शाळेच्या वेळेत परिसरात एकच वर्दळ असते. शिवाय उसाचे ट्रक, मळीचे टँकर व इतर वाहनांमुळे विद्यार्थ्यांना अपघात होण्याची शक्यता असल्याने संबंधित अधिकाऱ्यांनी रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)

Web Title: Sidebar demand near Dabhadhi Vidyalaya