पूर्ववैमनस्यातून सिडकोत एकाचा खून

By Admin | Updated: September 11, 2014 00:29 IST2014-09-10T20:56:57+5:302014-09-11T00:29:50+5:30

पूर्ववैमनस्यातून सिडकोत एकाचा खून

Siddkosh murder case | पूर्ववैमनस्यातून सिडकोत एकाचा खून

पूर्ववैमनस्यातून सिडकोत एकाचा खून


सिडको : पूर्ववैमनस्य तसेच मागील भांडणाचा राग डोक्यात ठेवून दोघा मित्रांनीच एकाचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली़ यातील एका संशयितास अंबड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे़
अंबड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मूळचा उपनगर येथील बजरंगवाडीत राहणारा सचिन ज्यानु काचेला (२७) हा सद्यस्थितीत सिडकोच्या पंडितनगर भागातील काळेमामाच्या चाळीत राहत होता़ रविवारी काचेला हा अतिमद्य सेवन करून घरी आल्याची माहिती त्याच्याशी पूर्वी भांडण झालेले संशयित गजेंद्र गावित व त्याच्या साथीदारास मिळाली़ या दोघांनी सिडकोतील काचेलाचे घर गाठून तो झोपलेला असताना त्याच्या डोक्यावर, चेहऱ्यावर, पोटावर व पाठीवर धारदार हत्त्याराने वार केले़ या घटनेनंतर हे दोघेही फरार झाले़
सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश बर्ढेकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली़ या प्रकरणी मयत सचिन काचेलाची पत्नी ज्योती सचिन काचेला यांनी अंबड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे़ या घटनेबाबत बर्ढेकर यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे उपनिरीक्षक किरण मतकर, दत्तात्रय पाळदे, उत्तम पवार, विष्णू उगले या चौघांच्या पथकाला पाठवून संशयित गजेंद्र गावित यास ताब्यात घेतले़ (वार्ताहर)

Web Title: Siddkosh murder case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.