शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

बहीण-भावाचा डबक्यात बुडून मृत्यू, सिन्नर तालुक्यातील घटना

By प्रसाद गो.जोशी | Updated: May 2, 2024 01:20 IST

मृतातील भाऊ पाच तर बहीणचार वर्षांची आहे.

शैलेश कर्पे -सिन्नर : तालुक्यातील रामनगर येथे डबक्याजवळ खेळणाऱ्या बहीण भावाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली. मृतातील भाऊ पाच तर बहीणचार वर्षांची आहे.तालुक्यातील रामनगर येथे गावाजवळच असणाऱ्या डबक्याजवळ आयुष्य रवींद्र बंडकर(५) व धनश्री रवींद्र बंडकर(४) हे बहीण भाऊ आणि एक लहान मुलगा खेळत होते. यावेळी खेळताना पाय घसरून डबक्यात बुडून या दोघांचा मृत्यू झाला. सोबत खेळणारा  मुलगा त्या ठिकाणी रडत बसला होता. गावात बस आल्यानंतर एक प्रवासी पायी जात असताना त्याला रडणारा मुलगा दिसला. या प्रवाशांने त्याच्याकडे विचारपूस केल्यानंतर दोन जण डब्यात बुडाल्याची माहिती समोर आली. या प्रवाशांने आरडाओरडा केल्यानंतर गावातील नागरिक मदतीसाठी धावून आले. या  भाऊ बहिणीला डबक्यातून बाहेर काढण्यात आले.  तातडीने त्यांना रुग्णालयात नेण्यात आले तथापि त्यांचा मृत्यू झाला होता. या दोन्ही भावंडाचे आई-वडील मोल मजुरी  करतात. वडील नांदूर शिंगोटे येथे कामावर गेले होते तर आई घरी होती. घटनेची माहिती समजल्यानंतर रामनगर गावावर शोककळा पसरली. या दोन्ही लहान भावंडांचे मृतदेह सिन्नर नगरपरिषद रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक दिलीप राठोड, हवालदार हेमंत तांबडे यांनी पंचनामा केला.

टॅग्स :Deathमृत्यूPoliceपोलिस