शुकशुकाट : सिन्नर, घोटी, इगतपुरी, दिंडोरी, लासलगाव आदि ठिकाणी व्यवहार कडकडीत बंद

By Admin | Updated: August 25, 2015 00:26 IST2015-08-25T00:25:40+5:302015-08-25T00:26:28+5:30

संथारा व्रताच्या समर्थनार्थ जिल्ह्यात मोर्चे

Shukushkat: Sinnar, Ghoti, Igatpuri, Dindori, Lasalgaon, etc | शुकशुकाट : सिन्नर, घोटी, इगतपुरी, दिंडोरी, लासलगाव आदि ठिकाणी व्यवहार कडकडीत बंद

शुकशुकाट : सिन्नर, घोटी, इगतपुरी, दिंडोरी, लासलगाव आदि ठिकाणी व्यवहार कडकडीत बंद

नाशिक : संथारा व्रताच्या समर्थनार्थ येथील श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाच्या वतीने मूक मोर्चा काढण्यात येऊन मागणीचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. सिन्नर येथे मनोजकुमार खैरनार यांना निवेदन देण्यात आले. जैन समाजात संथारा व्रताला विशेष महत्त्व आहे. संथारा व्रत म्हणजे आत्महत्त्या नसून धार्मिक महत्त्व असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
सिन्नर येथील जैन स्थानकात सकाळी जैन समाजबांधव एकत्र आले. त्यानंतर जैन स्थानकातून मोर्चास प्रारंभ करण्यात आला. संघपती मनोजकुमार भंडारी, उपाध्यक्ष धनेश भन्साळी, आनंद खिंवसरा, डॉ. महावीर खिंवसरा, प.पू. साध्वी मनीप्रथाजी, प.पू. निधीज्योतीजी, प.पू. रुजुताजी यांच्यासह मोर्चात सहभागी झालेल्या जैन समाजबांधवांनी तहसीलदार खैरनार यांना निवेदन दिले.
सिन्नर शहरातून काढण्यात आलेल्या मूक मोर्चात भवरीलाल चोपडा, माणिकलाल भंडारी, दीपक भंडारी, महेश पारख, अभिषेक बोरा, नितीन चोरडिया, बन्सीशेठ भंडारी, किरण कटारिया, राहुल बुरड, प्रमोद कांकरिया, बिपीन कटारिया, अर्चना भन्साळी, सुनीता ओस्तवाल, वैशाली भंडारी, पूजा खिंवसरा, सारिका छाजेड, मंगला खिंवसरा, मधुबाला कटारिया, सुनीता चोरडिया, शर्मिला चोरडिया, आरती कटारिया, चंपालाल चोरडिया, शांतीलाल खिंवसरा, सुनीलकुमार कटारिया, महावीर भन्साळी, ताराचंद खिंवसरा, मोतीलाल खिंवसरा, महेश पारख, विजय चोरडिया, कांतीलाल खिंवसरा, पंकज भंडारी, चंद्रकांत शाह, कल्पेश कोठारी, प्रज्ञा जैन, महेश पारख, मोहनलाल खिंवसरा यांच्यासह जैन समाजबांधव सहभागी झाले होते.
संथारा व्रताच्या समर्थनार्थ घोटी बंद
घोटी : संथारा व्रताच्या समर्थनार्थ याचिका दाखल करावी या मागणीसाठी सोमवारी घोटी शहरात जैन समाज बांधवांनी व्यवहार बंद ठेवून मूक मोर्चा काढण्यात आला.
याप्रसंगी घोटी पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक सुरेश मनोरे यांना सकल जैन बांधावांतर्फे निवेदन देण्यात आले. यावेळी घोटी जैन संघाचे प्रमुख किसनलाल पीचा, उमेद पीचा, नंदकुमार शिंगवी, शांतीलाल पीचा, ज्येष्ठ नेते अशोक मुनोत, डॉ. अभय जैन, चांदमल भन्साळी, कवरीलाल चोरडिया, कांतीलाल श्रीश्रीमाळ, मेहुल शहा, हंसराज कुमट, जैन संघटना अध्यक्ष जयेश पीचा, सागर कुमट, ललित पीचा, सचिन लोढा, तुषार बोथरा, संदीप पीचा, उमेश भन्साळी, दीपक चोरडिया आदि समाज बांधव उपस्थित यांनी निवेदन दिले. त्याप्रसंगी समाजाचे विविध संस्थांचे पदाधिकारी, संघटनेचे कार्यकर्ते व विशेषकरून जैन युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दिंडोरीत मूक मोर्चा
दिंडोरी : संथारा व्रताच्या समर्थनार्थ येथील जैन बांधवांनी मूक मोर्चा काढत व्यवसाय बंद ठेवून दिंडोरी तहसीलदार मंदार कुलकर्णी यांना निवेदन दिले. निवेदनात संथारा ही जैन समाजातील अतिशय प्राचीन प्रथा असून, या प्रथेची तुलना सतीसारख्या अमानवीय व आत्महत्त्येसारख्या कृत्याशी कोणत्याही स्थितीत केली जाऊ नये. भारतीय घटनेत सर्वानाच धार्मिक प्रथा, परंपरा पालन करण्याचा हक्क बहाल केला आहे. त्यामुळे राजस्थान उच्च न्यायालयाच्या निर्णयाला भारत सरकार व राजस्थान सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान देऊन जैन समाजाच्या भावनांचा आदर करावा, अशी जैन समाजातर्फे मागणी करण्यात आली आहे.
पिंपळगाव बसवंत येथे मोर्चा
पिंपळगाव बसवंत : संथारा व्रताच्या समर्थनार्थ येथील जैन समाजाच्या वतीने मूक मोर्चा काढण्यात आला. जैन स्थानक मंदिरापासून मोेर्चास प्रारंभ करण्यात आला. पुढे हा मोर्चा मुख्य रस्त्याहून पोलीस ठाण्यापर्यंत नेण्यात आला. या प्रसंगी अध्यक्ष मनोज मुथा, प्रमोद भटेवरा व महामंत्री राजेंद्र सोनी, सुभाष धाडीवाल, शांतीलाल चोरडिया, साहेबचंद पगारिया, शांतीलाल धाडीवाल, बन्सीलाल छाजेड, श्यामलाल बोरा, रवींद्र चंडालिया, धनसुख भंडारी, कांतीलाल सोनी, उमेश जैन, प्रकाश पगारिया, मोतीलाल चोरडिया, अशोक शहा, ईश्वर भंडारी, भवरीलाल
बागरेचा आदिंसह समाजबांधव उपस्थित होते.

Web Title: Shukushkat: Sinnar, Ghoti, Igatpuri, Dindori, Lasalgaon, etc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.