बाजार समितीत दुसऱ्या दिवशीही शुकशुकाट
By Admin | Updated: June 2, 2017 19:21 IST2017-06-02T19:21:03+5:302017-06-02T19:21:03+5:30
शेतकरी संप : कोट्यवधींची उलाढाल ठप्प

बाजार समितीत दुसऱ्या दिवशीही शुकशुकाट
लोकमत न्यूज नेटवर्क
पंचवटी : राज्यातील शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी तसेच कर्जमाफीसाठी पुकारलेल्या संपाचा परिणाम दुसऱ्या दिवशीही नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत जाणवला. बाजार समितीत दुसऱ्या दिवशी कोणत्याही प्रकाराच्या शेतमालाची आवक न आल्याने बाजार समितीची कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली.