शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

बँकिंग व्यवस्था पॅकेजमुळेच वाचली शिवप्र्रताप शुक्ल : बँक आॅफ महाराष्ट्र अधिकारी संघटनेच्या अधिवेशनाचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 01:40 IST

नाशिक : आर्थिक गैरव्यवहार व एनपीएमुळे देशातील बँकिंग व्यवस्था अतिशय अडचणीत आली असून, वाढते एनपीएचे प्रमाण, नीरव मोदीसारख्यांकडून बँकांची झालेली फसवणूक यामुळे बँकांची विश्वसनीयता धोक्यात आली आहे.

ठळक मुद्देतर देशातील बँकिंग व्यवस्था संपुष्टात आली असती पैसे सुरक्षित राहतीलच याबाबत बँकांचे ग्राहक साशंक

नाशिक : आर्थिक गैरव्यवहार व एनपीएमुळे देशातील बँकिंग व्यवस्था अतिशय अडचणीत आली असून, वाढते एनपीएचे प्रमाण, नीरव मोदीसारख्यांकडून बँकांची झालेली फसवणूक यामुळे बँकांची विश्वसनीयता धोक्यात आली आहे. बँकिंग क्षेत्राला उभारी मिळावी याकरिता केंद्र सरकारने २ लाख ११ हजार कोटी रुपयांचे पॅकेज दिले. त्यामुळेच देशातील बँकिंग व्यवस्था वाचली असून जर सरकारने हे पाऊल उचलले नसते तर देशातील बँकिंग व्यवस्था संपुष्टात आली असती आणि सरकारलाही राजीनामा द्यावा लागला असता असे खळबळजनक वक्तव्य केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शिवप्रताप शुक्ल यांनी केले.आनंदवल्ली पाइप लाइनरोडवरील एका मंगल कार्यालयात बँक आॅफ महाराष्ट्र आॅफिसर्स आॅर्गनायझेशनच्या १९व्या त्रैवार्षिक अधिवेशनाच्या उदघाटन सोहळ्यात शनिवारी (दि.२६) ते बोलत होते. व्यासपीठावर खासदार हेमंत गोडसे, बँक आॅफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र मराठे, भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष लक्मा रेड्डी, सुधाकर कुलकर्णी, बाळासाहेब फडणवीस आदी उपस्थित होते.शिवप्र्रताप शुक्ल म्हणाले, सरकारी बँकांचा देशातील बँकिंग क्षेत्रावर मोठा प्रभाव आहे. पूर्वी बँकिंग व्यवस्थेबाबत नागरिकांमध्ये विश्वास होता. आज परिस्थिती बदलली असून खात्यावरचे पैसे सुरक्षित राहतीलच याबाबत बँकांचे ग्राहक साशंक आहेत. त्यामुळे या व्यवस्थेवरून बँकांचा विश्वास उडत चालला असून कर्जबुडव्यांमुळे एनपीए वाढले आहेत. नीरव मोदीसारख्यांकडून बँकांची फसवणूक झाल्यामुळे बँकिंग क्षेत्र अडचणीत असून ही व्यवस्था सावरण्यासाठीच केंद्र सरकारने २ लाख ११ हजार कोटींचे पॅकेज देऊ केल्याचे सांगतानाच पॅकेज दिले नसते तर बँक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली असती असे त्यांनी सांगितले. त्यामुळे आता बँकांची जबाबदारी वाढली असून, स्पर्धेच्या युगाला तोंड देताना बँकांना आपली विश्वसनीयता पुन्हा निर्माण करावी लागणार असल्याचे ते म्हणाले.या अधिवेशनासाठी देशभरातून संघटनेचे १२०० प्रतिनिधी उपस्थित असून, या दोन दिवसीय अधिवेशनात कर्मचारी, अधिकारी यांचे वेतनकरार, राष्ट्रीयीकृत बँकांच्या खासगीकरणाला विरोध, बँकांचे विलिनीकरण थांबवणे आणि दि. ३० व ३१ मे रोजीच्या संपाबाबत चर्चा करण्यात येणार आहे.पीएनबी घोटाळ्याचे खापर ब्रँच अधिकाऱ्यावरपंजाब नॅशनल बँके चा घोटाळा बँकेच्या ब्रँच अधिकाºयामुळे झाल्याचे सांगत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शिवप्रताप शुक्ल यांनी घोटाळ्याचे खापर शाखेच्या व्यवस्थापकावर फोडले. प्रत्यक्षात गैरव्यवहार झाल्यानंतर तीन ते चार वर्षांनी समोर आला. त्यामळे वरिष्ठ अधिकाºयांसह सनदी लेखापाल व शासकीय यंत्रणांविषयीही साशंकता असताना शुक्ल यांनी अधिवेशनात या घोटाळ्यात पीएनबीच्या संबंधित शाखेच्या व्यवस्थापकामुळे हा घोटाळा झाल्याचे सांगितले.