मालेगावी शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शोभायात्रा

By Admin | Updated: June 14, 2014 01:20 IST2014-06-14T01:20:23+5:302014-06-14T01:20:23+5:30

मालेगाव : येथे शिवराज्या -भिषेकदिनानिमित्त शिवराज्याभिषेक समितीतर्फे शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले.

Shubhayatram on the occasion of Malegaavi Shivrajyabhishek | मालेगावी शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शोभायात्रा

मालेगावी शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शोभायात्रा

मालेगाव : येथे शिवराज्या -भिषेकदिनानिमित्त शिवराज्याभिषेक समितीतर्फे शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले.
सायंकाळी स्टेट बॅँक चौक येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नाशिक विभागप्रमुख विठ्ठल शिंदे यांच्या हस्ते शिवरायांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला.
कॅम्प रस्ता, मोसमपूल, महात्मा फुले रोड संगमेश्वर, दत्तमंदिर चौक, आंबेडकरपूल, आंबेडकर पुतळा, हेडगेवार मार्गाने छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याजवळ सदर शोभायात्रेचा समारोप झाला.
सदर शोभायात्रेत समितीचे सर्व सदस्य भगवे फेटे घालून सहभागी झाले होते. तसेच ढोल-ताशांच्या गजरात तीन पावली नृत्यावर समितीच्या कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. यावेळी समितीचे अध्यक्ष सोहनलाल जैन, सतीश कजवाडकर, दिलीप पिंगळे, राजेंद्र शास्त्री, हरिप्रसाद गुप्ता, नितीन पोफळे, मच्छिंद्र शिर्के, मालेगाव जिल्हा कार्यवाह आबा बच्छाव, शहर कार्यवाह दीपक थोरात, गितेश बाविस्कर, भरत पोफळे, दादा जाधव, प्रमोद शुक्ला, नगरसेवक गुलाब पगारे, रवींद्र जैन, महावीर छाजेड आदिंसह शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Shubhayatram on the occasion of Malegaavi Shivrajyabhishek