इगतपुरी येथे गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 23:06 IST2019-04-06T23:05:47+5:302019-04-06T23:06:09+5:30
इगतपुरी : गुढीपाडवा व चैत्र नवरात्र उत्सवानिमित्त तालुक्याचे ग्रामदैवत असलेल्या घाटनदेवी माता मंदिराच्या कलशरोहणानिमित्त इगतपुरी शहरातून शनिवारी सकाळी शोभायात्रा काढण्यात आली.

इगतपुरी येथे गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रा
इगतपुरी येथे घाटनदेवी माता कलशारोहण सोहळ्यानिमित्त शोभायात्रेत सहभागी कुंभकलश घेऊन महिला भाविक.
इगतपुरी : गुढीपाडवा व चैत्र नवरात्र उत्सवानिमित्त तालुक्याचे ग्रामदैवत असलेल्या घाटनदेवी माता मंदिराच्या कलशरोहणानिमित्त इगतपुरी शहरातून शनिवारी सकाळी शोभायात्रा काढण्यात आली.
यावेळी शहरातील सर्व रस्त्यावर रांगोळी, गुलाब पुष्पांचा सडा टाकण्यात आला होता. या शोभायात्रेत आदिवासी नृत्य, लेजीमसह मोठ्या प्रमाणात महिला डोक्यावर कुंभकलश व गौराई घेऊन व विविध देवांच्या वेशभूषा केलेले कलाकार या शोभायात्रेचे आकर्षण ठरले. या शोभायात्रेची सुरुवात शहरातील मीनलताई तांबोळी चौकातून करण्यात येऊन लोया रोड, नगर परिषद कार्यालय, आग्रा रोड ते तीनलकडी मार्गे काढण्यात आली. स्वामी गोविंद देवगिरी महाराज रथावर विराजमान झाले होते. सर्व परिसर ढोल ताशाच्या गजरात हरिपाठ व घाटनदेवी माता की जय आदी घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. या बालाजी मंदिर येथे या शोभायात्रेचा समारोप करण्यात आला. दि. ६ ते १४ एप्रिलपर्यंत रोज तीन वाजेपासून आचार्य विद्यावाचस्पती परमपूज्य स्वामी श्री गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या ज्ञान मधुर वाणीतून मराठीत श्रीमद्देवी भागवत कथा व शतचंडी यज्ञाला सुरु वात करण्यात आली. शनिवारी पहिल्या दिवशी भाविकांनी मोठ्या प्रमाणात देवी भागवत कथा ऐकण्यासाठी गर्दी केली होती.