शिरसमणी-साकोरे रस्त्याची दुरवस्था
By Admin | Updated: July 3, 2017 00:09 IST2017-07-03T00:09:26+5:302017-07-03T00:09:53+5:30
कळवण : शिरसमणी-साकोरे रस्त्याची दुरावस्था झाली असुन या मार्गाने होणारी शेतमाल वाहतुक बंद झाल्याने त्रास सहन करावा लागत आहे

शिरसमणी-साकोरे रस्त्याची दुरवस्था
लोकमत न्यूज नेटवर्क
कळवण : गेल्या दोन वर्षापासुन शिरसमणी-साकोरे रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली असुन या मार्गाने होणारी शेतमाल वाहतुक पुर्णपणे बंद झाल्याने शेतकरी बांधवांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.रस्ता सुधारण्याची वारंवार मागणी करु नही दुर्लक्ष होत असल्याने नागरीकांनी नाराजी व्यक्त केली असुन लवकरात लवकर ह्या रस्त्याची सुधारणा करण्याची मागणी शेतकरी व नागरीकांनी केली आहे. शिरसमणी ते साकोरे हा रस्ता अंदाजे तीन किलोमीटरचा असुन शिरसमणी,दह्याणे,कुंडाणे,भुसणी,ओतुर,जिरवाडे या गावातील शेतकरी आपला भाजीपाला व कांदा विक्र ीसाठी वणी व नाशिक येथील कृषी उत्पन्न बाजार समतिीमध्ये घेवुन जाण्यासाठी मुख्यत्वा:ह याच रस्त्याचा वापर करतात.मात्र गेल्या दोन वर्षापासुन रस्त्याच्या झालेल्या दुर्दशेमुळे या रस्त्याने होणारी वाहतुक पुर्णपणे बंद झालेली आहे. हा रस्ता तीन ते चार ठिकाणी खचला असुन अपघात होण्याची शक्यता आहे.जड वाहतुकीमुळे बहुतांश ठिकाणी खड्डे पडले असुन वाहन चालवणे जिकीरीचे झाले आहे.शेतकरी बांधवांना शेतमाल विक्र ीसाठी नेतांना धोकादायक परिस्थितीचा सामना करावा लागत असुन रस्त्याच्या दुतर्फा वाढलेल्या काटेरी झुडपांमुळे रस्ता अक्षरश: शोधावा लागत असल्याची परिस्थिती आहे. गत दोन वर्षापासुन या रस्त्याच्या दुरु स्तीची मागणी केली असुन सार्वजनिक बांधकाम विभाग व लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत असल्याने शेतकरी बांधवांनी नाराजी व्यक्त केली आहे. या रस्त्याची त्वरीत दुरु स्ती करण्याची मागणी संदिप शिरसाठ, श्रीकांत वाघ, प्रशांत चव्हाण, संदिप सावकार,सुरेश वाघ आदींसह शेतकरी बांधवांनी केली आहे.विद्यार्थ्यांना करावी लागतेय पायपीट-रस्त्याच्या दुरावस्थेमुळे विद्यार्थी वाहतुक करणारी वाहने या रस्त्याला येत नसल्याने शालेय विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी पायपीट करावी लागत असुन रस्ता खराब असल्याने विद्यार्थ्यांचे देखील हाल होत आहेत.रस्त्याच्या या अवस्थेमुळे विद्यार्थी,शेतकरी व नागरीक या सर्वच घटकांना समस्या भेडसावते आहे.