‘श्रीयशा’ पुरस्कार प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2016 00:22 IST2016-07-26T00:22:05+5:302016-07-26T00:22:40+5:30

गुणवंतांचा गौरव : रविवार कारंजा जैन स्थानकात कार्यक्रम

'Shrishisha' award prize | ‘श्रीयशा’ पुरस्कार प्रदान

‘श्रीयशा’ पुरस्कार प्रदान

 नाशिक : दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी डॉ. सुषमा दुगड यांच्यातर्फे जैन समाजातील इयत्ता दहावी आणि बारावीतील यशस्वी विद्यार्थ्यांना ‘श्रीयशा पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. रविवारी (दि. २४) रविवार कारंजा येथील जैन स्थानक येथे दर्शनप्रभाजी म.सा. आणि अनुपमाजी म.सा. यांच्या उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
रविवारी झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी २०१५ आणि २०१६ या दोन्ही वर्षातील यशस्वी विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.
२०१५ साली घेण्यात आलेल्या दहावीतील परीक्षेतील पार्श्व दुगड ( ९८ टक्के), मनुजा बुरड (९७ टक्के), प्रणव चोपडा (९६ टक्के) तर बारावीतील सलोनी बुरड (८८ टक्के), सदानंद छल्लाणी, मेघल कोठारी यांनी ८६ टक्के गुण मिळवले. २०१६ साली घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेतील सिद्धार्थ बुरड (९६ टक्के), सेजल लोढा (९५ टक्के), श्रेयस लोढा, तर बारावीतील करिना बोहरा (९२ टक्के ), मानस बेदमुथा (९१ टक्के), गौतमी छाजेड (८८ टक्के) तर प्रगती जैन यांना (८८ टक्के ) श्रीयशा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर श्रीमन खिवंसरा, यश चोरडिया, प्रथमेश भंडारी, इशा तातेड यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली.
यावेळी पुरस्कार वितरण समारंभप्रसंगी शांतीलाल दुगड, प्रीतिसुधाजी शिक्षण फंडाचे सदस्य सुभाष लुणावत, अ‍ॅड. विद्युलता तातेड यांच्यासह जैन समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित
होते. (प्रतिनिधी)

Web Title: 'Shrishisha' award prize

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.