शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

भेंडाळीत लोकसहभागातून श्रीराम मंदिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 16:09 IST

एक्कावन्न लाखाची वर्गणी : १२ एप्रिलला प्राणप्रतिष्ठा

ठळक मुद्देगावात मंदिर उभारण्याचा संकल्प झाला आणि गावातील प्रत्येक कुटुंबाने आपल्या आर्थिक परिस्थिती नुसार मंदिरासाठी योगदान दिले.

सायखेडा : भेंडाळी आणि औरंगपूर या दोन्ही गावांच्या मध्यवर्ती ठिकाणी संयुक्त श्रीराम मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले असून ग्रामस्थांच्या सहकार्याने ५१ लाख रु पयाची वर्गणी जमा करून भव्य दिव्य मंदिराची उभारणी करण्यात आली आहे. येत्या १२ एप्रिल रोजी मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे.सुमारे शंभर वर्ष जुने श्रीराम मंदिर गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी होते. मंदिराची पडझड होत असल्याने त्याच ठिकाणी भव्य दिव्य मंदिर उभारण्याचा दोन्ही गावांच्या नागरिकांनी निश्चय केला. दोन वर्षे वेगवेगळे प्लॅन तयार करण्यात आले. गावात मंदिर उभारण्याचा संकल्प झाला आणि गावातील प्रत्येक कुटुंबाने आपल्या आर्थिक परिस्थिती नुसार मंदिरासाठी योगदान दिले. वर्षभरापूर्वी प्रत्यक्ष कामाला सुरु वात झाली. शेतकरी ,व्यावसायिक, नोकरदार यांनी हातभार लावून ५१ लाख रु पयांचा निधी जमा केला. शिंगवे येथील ठेकेदाई धोंडीराम रायते यांनी कमी दराने काम पूर्ण केले. मंदिरात जयपूर येथून मूर्ती आणण्यात आल्या आहेत. दि. १० एप्रिल रोजी शोभायात्रा, नांदीश्राद्ध, मंगलस्नान, गणपती पूजन, नवग्रह पूजन, होमहवन. दि. ११ एिप्रल रोजी स्थापित देवता पूजन, होमहवन,मूर्तीस धान्यदिवस. दि. १२ एप्रिल रोजी मूर्ती स्थापना, कलशारोहन,महाआरती, महाप्रसाद आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.शंकराचार्यांची उपस्थिती लाभणारयानिमित्त काशी येथील शंकराचार्य विदा नृशिंहभारती रामकृष्णदास महाराज लहवीतकर यांच्या हस्ते कलशपूजन, मूर्ती स्थापना करण्यात येणार आहे. यावेळी गुडीपाडवा ते हनुमान जयंती पर्यंत सलग पंधरा दिवस हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे याशिवाय राज्यातील नामवंत कीर्तनकारांचे कीर्तन होणार आहे.

टॅग्स :NashikनाशिकTempleमंदिर